बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मुख्यमंत्र्यांकडून कोरोना नियमांचं उल्लंघन; पहिल्यांदाच दिसले विनामास्क

नाशिक | देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रसार आटोक्यात येत आहे. यामुळे रुग्णांची संख्याही कमी झाली असून देशातील आरोग्य यंत्रणेवरचा भार थोडा हलका झाला आहे. कोरोना प्रसार रोखण्यासाठी सरकार प्रयत्नशील असलेलं पाहायला मिळत आहे. अशातच सध्या राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाकाळात मास्क घातला नाही म्हणून त्यांच्यावर टीका केली जात आहे.

सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नाशिक दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी चक्क कोरोना नियमांचं उल्लंघन केल्याचं पाहायला मिळालं. नाशिकमधील महाराष्ट्र पोलीस अकॅडमीतील अत्याधुनिक सोयीसुविधांच्या उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाचं उद्घाटन मुख्यमंत्र्याच्या हस्ते पार पडलं. कार्यक्रमाच्या भाषणावेळी ठाकरेंनी विनामास्क भाषण केलं.

गर्दीच्या ठिकाणी मास्क घालण्याच्या नियमांचा यावेळी मुख्यमंत्र्यांनी फज्जा उडवल्याचं पाहायला मिळालं. भाषणामध्ये त्यांनी सांगितलं की, हा माझा पहिला सार्वजनिक कार्यक्रम आहे. जिथे मी विना मास्क जनतेला संबोधित करत आहे.

दरम्यान, महाराष्ट्र पोलीस अकॅडमीतील अत्याधुनिक सोयीसुविधांच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमावेळी मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना चांगलं प्रशिक्षण देताना अकॅडमीच्या आवश्यक गरजा पूर्ण करण्यासाठी सरकार सहकार्य करेल, असं आवाहन केलं आहे.

थोडक्यात बातम्या –

राखी सावंतचा भालाफेकीचा कारनामा; व्हिडीओ सोशल मीडियावर होतोय व्हायरल

उर्वरित आयपीएल सामन्यांसाठी नवी नियमावली जाहीर; ‘या’ नियमात केले बदल

“पंकजा मुंडे माझ्या बहिण, त्यांनी अजून भावाला त्यांचं दु:ख सांगितलं नाही”

आता विदेशातील नागरिकही घेऊ शकतात भारतात लस, केंद्राचा महत्वपुर्ण निर्णय

रेल्वे प्रवास करणाऱ्यांसाठी खुशखबर, तिकीट निश्चिती आरक्षणाचे नियम बदलले

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More