नवी दिल्ली | सिंघू सीमेवर पुन्हा एकदा संघर्ष पेटला आहे. शेतकरी आंदोलनावर ठाम असताना स्थानिकांनी या भागात धाव घेतली आहे.
शेतकऱ्यांनी सिंघू बॉर्डर खाली करावी, अशी मागणी स्थानिकांनी केली. शेतकरी आंदोलनामुळे आमचा व्यवसाय ठप्प झाला आहे, असा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे.
स्थानिक शेतकऱ्यांच्या तंबूजवळ गेले आणि त्यांचं सामान तोडायला सुरूवात केली. यानंतर शेतकरी आणि स्थानिकांमध्ये हाणामारीला सुरूवात झाली. यावेळी दगडफेकही करण्यात आली.
पोलिसांनी दोन्ही बाजूंना रोखण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना अखेर लाठीचार्ज करावा लागला आणि अश्रूधुराचा वापरही करावा लागला.
थोडक्यात बातम्या-
“राजकारणाच्या भानगडीत पडू नका, मी आलो आणि अडकलो, बाहेरही पडता येईना “
अखेर सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा सुरु होणार; ठाकरे सरकारचा मोठा निर्णय
राज्यात ‘या’ तारखेपर्यंत लॉकडाऊन कायम, ठाकरे सरकारचा निर्णय
नव्या कृषी कायद्यांचा देशातील 10 कोटी छोटया शेतकऱ्यांना लाभ झाला- रामनाथ कोविंद
प्रजासत्ताक दिनी झालेला तिरंग्याचा अपमान दुर्दैवी- रामनाथ कोविंद
Comments are closed.