नाशिक | नाशिकमध्ये ठिय्या आंदोलनाला हिंसक वळण लागलं आहे. आंदोलकांच्या दोन गटांमध्येच वाद झाला त्यामुळे आंदोलक एकमेकांना भिडले.
नाशिकमध्ये मराठा मोर्चेकऱ्यांकडून ठिय्या आंदोलन सुरू होतं. मात्र समन्वयकांच्या भाषणावरून दोन गटामध्ये बाचाबाची झाली. त्यामुळे आक्रमक झालेल्या आंदोलकांनी मराठा पदाधिकाऱ्यांच्या गाडीची तोडफोड केल्याचं समजतंय.
दरम्यान, या प्रकारानंतर पोलिसांचा मोठा बंदोबस्त करण्यात आला आहे. ठिकठिकाणी या आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिसांकडून नाकाबंदी करण्यात आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या–
-पाकिस्तानी अभिनेत्री आणि गायिका रेश्माची पतीकडून हत्या
-पुण्यातील आंदोलनाला हिंसक वळण; जिल्हाधिकारी कार्यालयाची तोडफोड
-हिंगोलीत रस्त्यावरच चुली पेटवून मराठा मोर्चेकऱ्यांचा बंद!
-मराठा आंदोलनात अजित पवार सामिल; शरद पवारांच्या घरासमोर केलं ठिय्या आंदोलन
-विधानभवनाच्या गेटवरच आमदार प्रकाश आबिटकरांचा ठिय्या!