लातूर | लातूरमध्ये मराठा आंदोलनाला हिंसक वळण लागलं आहे. आंदोलकांनी आक्रमक होत आमदार त्र्यंबक भिसे यांना धक्काबुक्की करत त्यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली.
आमदार त्र्यंबक भिसे ठिय्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी आले होते. मात्र आक्रमक आंदोलकांनी त्यांच्याविरोधात जोरदार घोषणा करत त्यांना धक्काबुक्की केली.
दरम्यान, आंदोलकांचा रोष पाहताच पोलिसांनी आणि त्यांच्या सुरक्षारक्षकांनी त्यांना सुखरूप बाहेर काढलं. मात्र त्यानंतर जमावाला शांत करण्यात आलं असून पोलिस बंदोबस्त करण्यात तैनात करण्यात आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या–
-पुण्यात तोडफोड करणारे मराठा आंदोलक नाहीत!!!
-मराठा आरक्षणावर तोडगा मिळाला- रावसाहेब दानवेंचा दावा
-नाशिकमध्ये हिंसक वळण; मराठा आंदोलकांच्या दोन गटात धक्काबुक्की!
-पाकिस्तानी अभिनेत्री आणि गायिका रेश्माची पतीकडून हत्या
-पुण्यातील आंदोलनाला हिंसक वळण; जिल्हाधिकारी कार्यालयाची तोडफोड