बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

शेतकरी आंदोलनाला हिंसक वळण! भाजप कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांमध्ये तुंबळ हाणामारी

नवी दिल्ली | केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात गेल्या सात महिन्यांपासून शेतकऱ्यांचं आंदोलन चालू आहे. मात्र, अद्याप केंद्र सरकारने यावर काही तोडगा काढलेला नाही. पंतप्रधान मोदींनी या कायद्यांनी शेतकऱ्याला फायदा होणार असल्याचं सांगितलं आहे. मात्र, शेतकरी आपलं आंदोलन मागे घेण्यास तयार नाहीत.

अशातच आता उत्तर प्रदेश मधील गाजीपूर सीमेवर आंदोलनातील शेतकरी आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. शेतकरी आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या या हाणामारीत अनेक वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे. तसेच अनेकांना या हाणामारीत शारिरीक ईजा झाल्याची देखील माहिती समोर आली आहे.

शेतकरी आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या या हाणामारीविषयी बोलताना गाजियाबाद इंदिरापुरमचे सीओ अंशु जैन म्हणाले की, गाजीपूरच्या सीमेवर आधीच धरणे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाच्या ठिकाणाहून एका भाजप नेत्याची गाडी चालली होती. या नेत्याच्या स्वागतासाठी काही भाजप कार्यकर्ते तिथे उपस्थित होते. यावेळी भाजप कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांमध्ये सुरुवातीला बाचाबाची झाली आणि पुढे याच बाचाबाचीचे रुपांतर हाणामारीत झाले.

दरम्यान, केंद्र सरकारने नव्यानं मंजूर केलेल्या कृषी विधेयकांमुळे देशभरातील शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संताप पहायला मिळत आहेत. जोपर्यंत केंद्र सरकार हे कायदे मागे घेत नाही. तोपर्यंत आपण मागे हटणार नसल्याचं आंदोलनातील शेतकऱ्यांचं म्हणनं आहे. नव्या कृषी विधेयकांमुळे देशातील वातावरण दिवसेंदिवस तापत चाललं आहे. यामुळे मोदी सरकार या कृषी कायद्यांबद्दल काय तोडगा काढणार? हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या – 

“उद्धव ठाकरे आणि अजित पवारांनी आता परिणाम भोगायला तयार राहावं”

‘तुझे काही व्हिडीओ माझ्याकडे आहेत, उत्तर दे नाहीतर…’, ट्विटरवर सनी लिओनीला मिळतेय धमकी

महाराष्ट्रातील प्रवाश्यांना कर्नाटकमध्ये जायचं असल्यास ‘या’ नियमाचं करावं लागणार पालन

“शरद पवारांनी कोणाकोणाची जात काढली हे राज्याला माहितीये, भाजपने मला शहाणपणा शिकवू नये”

खुशखबर! आता इंजिनीअरिंग मराठीतही करता येणार; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची मान्यता

Shree

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More