बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“राहुल गांधींनी कार्टून चॅनलऐवजी न्यूज चॅनल पाहावं”

नवी दिल्ली | काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी कोरोनाचा भारतात होणारा संसर्ग पाहून मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. सरकारने योग्य वेळी निर्णायक पाऊल उचललं नाही असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. यावरून  त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब देब यांनी राहुल गांधींना प्रत्युत्तर दिलं आहे.

राहुल यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केल्यानंतर देब यांनी ट्विटरवरून त्यांना कार्टून चॅनलऐवजी न्यूज चॅनल पाहण्याचा सल्ला दिला आहे.

संपूर्ण देशात मोठ्या प्रमाणात स्क्रिनिंग सुरू आहे. अ‍ॅडव्हायजरी अगोदरपासूनच जारी करण्यात आली आहे. प्रत्येक ठिकाणी क्वारंटाईन सेंटर उघडलेले आहेत. सरकार अगोदरच कोरोनाविरुद्ध आक्रमक पावलं उचलत आहे. कृपया याबद्दल अधिक माहितीसाठी कार्टून नेटवर्क सोडून न्यूज चॅनलवर जा, असं ट्विट बिप्लब देब केलं आहे.

दरम्यान, सरकारच्या असक्षमतेची मोठी किंमत सगळ्या देशाला चुकवावी लागेल असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरकारवर निशाणा साधला होता.

ट्रेंडिंग बातम्या-

लॉकडाऊन होणार, ठाकरे सरकारने अखेर केले हे पाच बदल

पंकजा मुंडे यांच्या शिक्षक बदली धोरणाला राष्ट्रवादीचा खो

 महत्वाच्या बातम्या-

Apple कडून सर्वात स्वस्त MacBook लाँच; जाणून घ्या किंमत

धक्कादायक! कोरोनामुळे इटलीत एका दिवसात 475 जणांचा मृत्यू

कोरोनाला घालवण्यासाठी केंद्र सरकारने घेतला हा मोठा निर्णय

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More