मुंबई| सध्या तरूणाईचं टिकटॉक प्रेम आपल्याला महितच आहे. विविध नेत्यांचे, अभिनेत्यांचे त्याचप्रमाणे अभिनेत्रींचे टिकटॉक व्हिडीओ तुफान व्हयरल होत आहेत. असाच एक व्हिडीओ व्हायरल झालाय भाजप कार्यकर्त्याचा आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा!…
हा व्हिडीओ पनवेल येथे काढण्यात आलेला असून व्हिडीओ काढणाऱ्या व्यक्तीचं नाव दिपक खंडाळे असं आहे. खंडाळे हे चाळीसगावच्या उंबरखेडचे रहिवासी आहेत.
फडणवीस यांच्यासोबत टीकटॉक व्हिडीओ काढण्याची खूप दिवसांपासूनची त्यांची इच्छा होती. साहेबांसोबत व्हिडीओ काढण्यासाठी खास खान्देशमधून आलो आहे असं तो व्यक्ती व्हिडीओमध्ये सांगताना पहायला मिळतंय.
दरम्यान, या व्हिडीओमध्ये फडणवीस आपल्या कार्यकर्त्याशी अत्यंत अपुलकीने वागताना दिसत आहेत. त्याच्या चेहऱ्यावरील आनंद या व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसून येत आहे. हा व्हिडीओ टीकटॉक युजर्सच्या पसंतीस पडताना दिसत आहे.
ट्रेंडिंग बातम्या-
“केंद्रात गो-गो म्हणून बघा कधी तुमचा खो-खो करतील तुम्हाला पण नाही समजणार”
“मुख्यमंत्र्यांच्या पाठीचा कणा शाबूत असेल तर त्यांनी नितीन राऊतांच्या विरोधात कारवाई करून दाखवावी”
महत्वाच्या बातम्या-
“शेतात नांगर धरणारा राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आज उपाध्यक्ष पदावर बसतोय याचा आनंद”
विदर्भात कोरोनाचा शिरकाव… यवतमाळमध्ये दोघांना कोरोनाची लागण
कोकणचा हापूसही सापडला कोरोनाच्या कचाट्यात; शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या
Comments are closed.