Top News देश

सामूहिक बलात्कार कसा करावा?; सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल झाल्यानं खळबळ

नवी दिल्ली | उत्तर प्रदेशमधील हाथरस प्रकरणानंतर महिला सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. देशभरात या घटनेप्रकरणी संताप व्यक्त केला जात असतानाच आता सामूहिक बलात्कार कसा करावा?, हे सांगणारी पोस्ट सध्या सोशल मीडियात व्हायरल झाली आहे.

बंगाली भाषेत असलेली ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. कोलकातामधील अनेक लोकांनी ही पोस्ट शेअर केली आहे. प्रणाधिका सिन्हा देवबर्मन यांनी या प्रकरणी कोलकाता पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.

प्रणाधिका यांनी कोलकाता पोलिस आयुक्त तसंच सहआयुक्तांना ट्विटमध्ये मेंशन करत यामध्ये लक्ष घालण्याची विनंती केली आहे. प्रणाधिका यांच्या ट्विटला उत्तर देताना त्यांनी सहआयुक्तांकडे (गुन्हे) सर्व माहिती देण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. दरम्यान, ही पोस्ट बांगलादेशमधून शेअर केल्याची माहिती आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

हिम्मत असेल तर… रोहित शर्मानं ‘या’ खेळाडूला दिलं चॅलेंज!

‘धनुष्यबाण’ नव्हे निवडणूक आयोगानं शिवसेनेला दिलं ‘बिस्कीट’; शिवसेना म्हणते…

वंचित बहुजन आघाडीच्या प्रकाश आंबेडकर यांच्यावर गुन्हा दाखल

कर्ज हफ्त्यावरील स्थगिती अजून वाढवू शकत नाही, न्यायालयाने हस्तक्षेप करु नये- केंद्र सरकार

‘खाया पिया कुछ नहीं, ग्लास तोडा आठ करोड का’, सेहवागची केदार जाधववर टीका

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या