Viral Video । छोट्या हत्तीवर घेऊन चाललेत मोठा हत्ती, व्हिडीओ पाहून लोक झालेत हैराण!

Viral Video । सोशल मीडियावर कधी कोणती गोष्ट व्हायरल होईल याची कल्पना देखील केली जाऊ शकत नाही. प्रसिद्धीसाठी अनेकजण रील्स बनवून सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्मवर अपलोड करत असतात. ज्यांना यातून मोठ्या प्रमाणात व्ह्यूज मिळतात, त्यांचे आर्थिक गणित देखील सोयीस्कर होते. कारण व्ह्यूज जास्त असल्यास संबंधित सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे त्या युजरला मानधन मिळते.

छोट्या हत्तीवर मोठा हत्ती

आता सोशल मीडियावर एक भन्नाट व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये हत्तीची वाहतूक चक्क छोट्या हत्तीतून केली जात आहे. प्रवासादरम्यान तुम्ही अनेकदा टेम्पो किंवा ट्रकमधून गायी आणि म्हशींची वाहतूक करताना पाहिले असेल. मात्र, व्हायरल होत असलेल्या हत्तीच्या या व्हिडीओने सर्वांचेच लक्ष वेधले.

खरं तर या व्हिडीओमध्ये एक ‘छोटा हत्ती’ (गाडी) मोठ्या हत्तीला घेऊन जाताना दिसत आहे. व्हायरल होत असलेला 17 सेकंदांचा व्हिडीओ नेटकऱ्यांचे मनोरंजन करत आहे. या व्हिडीओमध्ये एक वाहन मोठ्या हत्तीची वाहतूक करत आहे. गाडी लहान अन् हत्ती मोठा असल्याचे पाहून अनेकांना धक्का बसला.

हा व्हिडीओ ‘छोटा हत्ती’च्या मागून जाणाऱ्या वाहनातून काढण्यात आला आहे. मात्र, हे संपूर्ण दृश्य पाहिल्यानंतर अनेकांनी हा हत्ती खोटा असल्याचे सांगितले. सोशल मीडियावरील काही युजर्संनी हा बनावट हत्ती असल्याचे सांगितले. हा व्हिडीओ चेन्नईतील असल्याचे बोलले जात आहे. या रस्त्यावर हे असे दृश्य अनेकदा पाहिले असल्याचेही काहींनी सांगितले.

Viral Video अन् नेटकऱ्यांमध्ये गोंधळ

पण, प्रथमदर्शनींना हा हत्ती खरा वाटतो. तर काही लोक तर्क लागू करून म्हणाले की, एवढा मोठा हत्ती ‘छोटा हत्ती’ घेऊन जाऊ शकत नाही. हे फक्त बनावट आहे. दरम्यान, हत्तीची वाहतूक करणाऱ्या गाडीचा वेग देखील जास्त असल्याचे दिसते. यावरून तरी संबंधित हत्ती बनावट असल्याचे स्पष्ट होते.

 

हत्तीचा हा भन्नाट व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांनी कमेंटच्या माध्यमातून छोटा हत्तीच्या चालकाची फिरकी घेतली. तसेच चालकाच्या या धाडसाचे कौतुक केले. कारण हत्ती बनावट असला तरी एवढ्या लहान वाहनात त्याची वाहतूक करणे आणि संतुलन राखणे हे धाडसी काम असल्याचे अनेकांनी सांगितले.

News Title- Viral Video A big elephant traveling in a small vehicle
महत्त्वाच्या बातम्या –

Female Teacher Sexually Abused 15 Year Old Student l 15 वर्षाच्या मुलासोबत शिक्षिकेनं ठेवले शारीरिक संबंध, असले मेसेज समोर आल्याने उडाली खळबळ

Rohit Sharma | आधीच 2 वेळा शून्यावर आऊट झालोय, त्यात तू… अंपायरवर भडकला रोहित शर्मा

Rohit Sharma | मी एकटाच पुरेसा आहे! अफगाणिस्ताननं अनुभवलं रोहित शर्मा नावाचं वादळ!

IND vs AFG | बलाढ्य टीम इंडियाला अफगाणिस्तानने फोडला घाम, डबल सुपर ओव्हरपर्यंत नेला सामना

Video | अबब! रोहित-रिंकू अक्षरशः तुटून पडले, शेवटच्या ओव्हरमध्ये रेकॅार्डब्रेक धावांचा पाऊस