देश

कोरोनाला घाबरवण्यासाठी टिकटॉकवर बनवलं गाणं, आतापर्यंत ५ कोटी लोकांनी पाहिलं!

मुंबई |  भारतीय लोक कधी काय करतील याचा नेम नाही. एकीकडे कोरोना जगभरासह सगळ्या भारतात धुमाकूळ घालतोय तर कोरोनाला घाबरवण्यासाठी भारतात गाणे तयार केले जात आहेत. अशीच काही गाणी आता सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागली आहेत.

पिंकी राहुल कुमार नावाच्या एका तरूणीने टीकटॉकवर कोरोनावरचं एक गाणं पोस्ट केलं आहे. या गाण्याला आतापर्यंत 5 कोटी लोकांनी पाहिलं आहे. हे गाणं लोकांच्या पसंतीस उतरताना दिसून येत आहे.

बात मोदी जी की हमने मान ली बस घर में ही रहें सब शांती कुछ ज्यादा दू उम्मीद मत रखना कोरोना हमें कमजोर मत समज कोरोना, असे गाण्याचे बोल आहेत. या गाण्यावर तरूणी खूप छान एक्प्रेशन देऊन डान्स करताना दिसून येत आहे.

पिंकीचं हे गाणं 41 लाख लोकांनी लाईक केलंय तर हा व्हीडिओ लाखो लोकांनी शेअर केला आहे. त्यामुळे सोशल मीडियावर पिंकीचा व्हीडिओ धुमाकूळ घालतोय.  टिकटॉक या माध्यमाने भारतीयांना भुरळ घातली आहे. कोरोनाच्या या कठीण काळात लॉकडाऊन असल्याने लोक टिकटॉकवर आपला वेळ घालवत आहेत.

गाण्याची लिंक-

https://www.tiktok.com/tag/corona_song?referer_url=https%3A%2F%2Fkhabar.ndtv.com%2Fnews%2Flifestyle%2Ftiktok-viral-video-on-coronavirus-song-and-girls-cute-expression-2215375&referer_video_id=6815419257589959938

ट्रेंडिंग बातम्या-

गेहलोत सरकारचा मोठा निर्णय; 5 कोटी लोकांना वाटणार मोफत गहू

अवकाळी पावसाने हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना शासनाचा दिलासा; दिले पंचनामे करण्याचे आदेश

महत्वाच्या बातम्या-

गुजरातमध्ये कोरोनाबाधित रूग्णांची संख्या वाढली; महाराष्ट्रापाठोपाठ गुजरातचा नंबर

राज्यातला कोरोनाबाधितांचा वेग मंदावला, घाबरू नका- आरोग्यमंत्री राजेश टोपे

महाराष्ट्र असाच चालवला तर लोक चपलेने आभार मानतील तुमचे- निलेश राणे

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या