बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

…अन् पोलिस कर्मचाऱ्याच्या सतर्कतेमुळे त्याचा जीव वाचला; काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडिओ

रायपूर | छत्तीसगडच्या रायपूर रेल्वे स्थानकातील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. रायपूर रेल्वे स्थानकात चालू रेल्वेत चढणारा एक माणूस पाय निसटल्याने रेल्वे खाली येता-येता थोडक्यात बचावला. कर्तव्यावर तैनात असलेल्या आरपीएफ अधिकाऱ्याच्या सतर्कतेमुळे या माणसाचा प्राण वाचला.

छत्तीसगड येथील रायपुर रेल्वे स्टेशनमधून एक रेल्वे फलाटावरून निघाली होती, त्याचवेळेला एक माणूस रेल्वे पकडण्याचा प्रयत्न आपल्याबरोबर सामान हातामध्ये घेऊन करत होता. पण अचानक पाय निसटल्याने त्याचा तोल गेला आणि तो रेल्वे आणि फलाटामधील अंतरात अडकणार तेवढ्यात रेल्वे पोलिस अधिकाऱ्याच्या सतर्कतेमुळे त्या माणसाला बाजूला ओढून त्याचा जीव वाचवण्यात त्यांना यश आलं.

सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यापैकीच एक म्हणजे हा व्हिडीओ. ट्विटरवर एका अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून त्या पोलिस कर्मचाऱ्यांवर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. सदरील कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याचं नाव शिवम सिंह असल्याचं कळतंय.

रेल्वे प्रशासनातर्फे वारंवार नागरिकांसाठी जनजागृती केली जाते. कोणीही चालती रेल्वे पकडू नका, रेल्वेच्या पुलाचा वापर करा इत्यादी गोष्टींचा त्यात समावेश असतो. पण तरीही काही महाभाग नियमांची पायमल्ली करून स्वतःचा जीव धोक्यात घालून असे जीवघेणे कृत्य करतात. मात्र अशा घटनांमध्ये दर वेळी कोणी आपला जीव वाचवायला येईलच असं नाही. आज शिवम सिंह नावाने देवदूत त्या माणसाचा जीव वाचवण्यासाठी आला. पण जर तो नसता तर त्या माणसाच्या जीवाचं काय झालं असतं? याचा विचारसुद्धा करायला नको. त्यामुळे आपण आपला जीव धोक्यात न घालता काळजी घेणं महत्त्वाचं आहे.

पाहा व्हिडिओ

थोडक्यात बातम्या –

माझं ठरलंय..फास्ट बॉलिंग, गुगली आणि बॅटिंगही करणार- देवेंद्र फडणवीस

पूजा चव्हाण प्रकरणात मोठी घडामोड, न्यायालयाने दिला ‘हा’ महत्त्वाचा आदेश

“कॅप्टन बदला हे संघाच्या बाहेर असलेल्या व्यक्तीने सांगून त्याचा काही फायदा होत नसतो”; फडणवीसांचा राऊतांना चिमटा

‘…म्हणून आपल्याकडच्या महिलांनी फिगर गमावली असून जाड झाल्या’; या नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य

महाराष्ट्र पुन्हा लाॅकडाऊनच्या उंबरठ्यावर; ‘या’ जिल्ह्यातही आजपासुन कडक लाॅकडाऊनचे आदेश!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More