बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

भावा तूच रे! कृणाल पांड्याच्या खिलाडूवृत्तीमागे हिटमॅन रोहितचाही हात, पाहा व्हिडीओ

मुंबई | पंजाब किंग्ज आणि मुंबई इंडिअन्सच्या सामन्यात मुंबईच्या हार्दिक पंड्याने केलेल्या दमदार खेळीच्या जोरावर मुंबईने विजय मिळवला. या सामन्यात मुंबईच्या कृणाल पांड्याचं कौतुक होत आहे. कारण कृणालने दाखवलेल्या खिलाडूवृत्तीने सर्वांची मन जिंकली आहेत.

पंजाबचा संघ फलंदाजी करत असताना 6 व्या षटकामध्ये कृणाल गोलंदाजी करत होता. त्यावेळी शेवटच्या चेंडूूवर गेल स्ट्राईकवर होता, गेलने जोरात सरळ शॉट मारला तेव्हा तो राहुलच्या हाताला लागला आणि चेंडू कृणालकडे गेला त्यानंतर त्याने धावबाद केलं. त्यानंतर मैदानावरीस पंच तिसऱ्या पंचाकडे जात होते मात्र तेव्हा कृणालने त्यांना थांबवलं.

सोशल मीडियालसह सर्वत्र कृणालच्या खिलाडूवृत्तीचं कौतुक होत आहे मात्र एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये मुंबईचा कर्णधार रोहित शर्मानेही पंचाकडे जाण्यास नकार दर्शवलेला दिसत आहे.

दरम्यान, राहुलने रोहित शर्माला थंब दाखवत त्याचे आभार मानले. भारतीय खेळाडूंची खिलाडूवृत्ती पाहून क्रीडा रसिकांनी त्यांचे मनापासून कौतुक केलं आहे. कालच्या सामन्यात पांड्याने आपल्या स्टाईलने फलंदाजी करत संघाला विजय मिळवून दिला.

पाहा व्हिडीओ-

 

 

थोडक्यात बातम्या- 

…तर आपलं सीट शंभर टक्के निवडून आलं समजा- सुप्रिया सुळे

प्रिती आणि रितेशच्या व्हायरल झालेल्या ‘त्या’ व्हिडीओवर जेेनेलिया म्हणाली…

मुंबईच्या कोरोना आकडेवारीत कमी अधिक प्रमाणात वाढ, वाचा आजची आकडेवारी

राज्याच्या कोरोना रूग्णांच्या आकडेवारीमध्ये चढ-उतार, जाणून घ्या आजची आकडेवारी!

पुणे कोरोना अपडेट; जाणून घ्या आजची आकडेवारी एका क्लिकवर 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More