बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

शाहरुख-गौरीचं टेन्शन मिटलं, कजरारे गाण्यावर दोघंही तुफान नाचले!, पाहा व्हिडीओ

मुंबई | शाहरूख खान (Shah Rukh Khan) हे नाव भारतीय सिनेमा जगताच्या प्रमुख केंद्रस्थानी आहे. शाहरूख खान आणि गौरी खान ही जोडी आपल्या खास अंदाजानं सर्वत्र प्रसिद्ध आहे. आपल्या रोमॅंटिक अंदाजानं ते कार्यक्रमाचं प्रमुख आकर्षक ठरतात. आताही गौरी खान (Gauri Khan) आणि शाहरूख खान यांच्या नाचण्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. (Viral video of Gauri Khan and Shah Rukh Khan dancing)

बाॅलिवूड (Bollywood) अभिनेत्री करिना कपूरच्या घरी एका कौटुंबिक विवाह सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या पार्टीला बाॅलिवूडमधील अनेक दिग्गज उपस्थित होते. पण खरी रंगत तर शाहरूख खान आणि गौरी खान यांनी आणली होती. शाहरूख आपल्या मेहनतीच्या जोरावर दिल्लीहून मायानगरीत येऊन बाॅलिवूडचा किंग तो आपल्या खास शैलीमुळंच झाला.

करिना कपूरच्या कौटुंबिक विवाह सोहळ्यास या जोडप्यानं हजेरी लावली होती. तेव्हा स्टेजवर कजरारे कजरारे या गाण्यावर गौरी खान आणि शाहरूख खान यांनी बहारदार नृत्य सादर केलं आहे. सध्या त्यांच्या या नृत्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर झपाट्यानं व्हायरल होत आहे. यात गौरी खान आपल्या अदाकारिनं अनेक अभिनेत्रींना लाजवत आहे.

दरम्यान, गौरी खान आणि शाहरूख खान यांच्यासोबत या व्हिडिओमध्ये करण जोहर सुद्धा उपस्थित आहे. शाहरूख खान आणि गौरी खान यांना खूप दिवसानंतर जुन्या अंदाजात पाहून चाहते खुश आहेत.

पाहा व्हिडीओ –

 

View this post on Instagram

 

A post shared by Filmfare (@filmfare)

थोडक्यात बातम्या 

देवेंद्र फडणवीसांना पाहून काँग्रेसच्या आमदारानं काढला पळ, कारणही सांगितलं…

“वडिलांना वचन दिलं म्हणून दुसऱ्याचं मुख्यमंत्रिपद घेतलं”

डीएसकेंना खरोखर आमदार चावला का?, आता नवीनच माहिती आली समोर

मालिका सुरु होण्याआधीच भारताला मोठा धक्का, ‘हा’ स्टार खेळाडू खेळणार नाही!

रात्रीस खेळ चाले! फडणवीस आणि काँग्रेस आमदाराच्या गुप्तभेटीच्या चर्चेनं मोठी खळबळ

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More