“…तर सर्वात आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी तुरुंगात जातील”

नवी दिल्ली | देशात लोकपाल कायदा अस्तित्वात आला तर सर्वात आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी तुरुंगात जातील, असं काँग्रेस नेते वीरप्पा मोईली यांनी म्हटलं आहे. ते संसदेत अंतरिम अर्थसंकल्पाच्या चर्चेदरम्यान बोलत होते. 

राफेलच्या मुद्द्यावरुनही त्यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली. राफेल हा अंतर्गत पातळीवर झालेला घोटाळा असून मोदी फार दिवस वाचू शकत नाहीत, असं त्यांनी म्हटलं आहे. 

सरकारने अर्थसंकल्पात संरक्षण क्षेत्रासाठी केलेल्या तरतुदींवरही मोईली यांनी जोरदार टीका केली. 

भारताची संरक्षण गुंतवणूक ही चीनच्या संरक्षण तरतुदीच्या पाचवा भाग आहे. त्यातील २० टक्के रक्कम राफेलसाठी खर्च होईल यावरुन सरकारचा फोलपणा उघड होतोय, असं ते म्हणाले. 

महत्वाच्या बातम्या-

-जो भ्रष्ट उसको मोदी से कष्ट है- नरेंद्र मोदी 

जनता मोदीजी के साथ चट्टान की तरह खडी है- अमित शहा

‘हग डे’ स्पेशल: काँग्रेसनं भाजपला दिल्या ‘हग डे’च्या शुभेच्छा!

“आम्हाला छोटे बच्चे समजू नको सर्वाधिक वर्ल्ड कप आम्हीचं जिंकले”

“काँग्रेस बुडणार राजघराणं; त्यांना वाचवण्यासाठी आणखी किती खोटं बोलणार”

Google+ Linkedin