कंडोमच्या ब्रँडकडून विरानुष्काला शुभेच्छा, नेटिझन्सनं घेतली मजा

कंडोमच्या ब्रँडकडून विरानुष्काला शुभेच्छा, नेटिझन्सनं घेतली मजा

मुंबई | लग्नानंतर विराट शर्मा आणि अनुष्का शर्मावर शुभेच्छांचा वर्षाव सुरु आहे. मात्र या सगळ्यांमध्ये कंडोमचा ब्रँड असलेल्या ड्युरेक्सने दोघांना अशा काही शुभेच्छा दिल्या आहेत ज्याची नेटिझन्स चांगलीच मजा घेत आहेत.

“विराट आणि अनुष्का तुमच्या दोघांच्या मध्ये आता कुणालाही येऊ देऊ नका, शिवाय ड्युरेक्सच्या”, असं ट्विट ड्युरेक्सच्या ऑफिशियल ट्विटर हँडलवरुन करण्यात आलंय.

नेटकऱ्यांनी यावरुन ड्युरेक्स तसेच विराट-अनुष्काची मजा घ्यायला सुरुवात केलीय.

माहिती प्रसारण मंत्रालयाने नुकताच एक आदेश दिलाय. ज्याद्वारे वाहिन्याना रात्री 10 ते सकाळी 6 या वेळेतच कंडोमच्या जाहिराती दाखवता येणार आहेत. त्या निर्णयाचा संदर्भ लावूनही याठिकाणी काही ट्विट्स करण्यात आली.

Google+ Linkedin