Top News देश मनोरंजन

विराट-अनुष्काला मुलगा होणार की मुलगी?; ज्योतिषानं केली ‘ही’ भविष्यवाणी

मुंबई | भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा लवकरच आई बाबा होणार आहेत. त्यातच त्यांना मुलगा होणार की मुलगी याबाबतची भविष्यवाणी समोर आली आहे.

प्रसिद्ध ज्योतिष पंडीत जगन्नाथ शास्त्री यांनी ही भविष्यवाणी केली आहे. विराट आणि अनुष्काला मुलगी होईल, असं त्यांनी म्हटलं आहे. इंडिया डॉट कॉमनं यासंदर्भात वृत्त दिलं आहे.

विराट-अनुष्काला एक गोंडस मुलगी होणार आहे. या मुलीमुळे त्यांच्या आयुष्यातील आनंद द्विगुणीत होईल. दोघांचा चेहरा वाचल्यानंतर आपल्याला हे समजल्याचं जगन्नाथ शास्त्री यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, ही मुलगी विराटसारखी तसेच राजकन्येसारखी असेल तसेच अनुष्कासारखी ती लाडकी असेल, असंही त्यांनी म्हटलं आहे. आता जगन्नाथ शास्त्री यांचं हे भाकीत खरं होणार की नाही हे येणारा काळच सांगेल.

थोडक्यात बातम्या-

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या