रोहित शर्माकडून विराटची फिरकी, अनुष्काला अनोखा सल्ला

मुंबई | नवविवाहित जोडप्याची फिरकी घेण्याची प्रथा तशी जुनीच मात्र विराट आणि अनुष्काची पहिली फिरकी घेण्याचा मान कुणाला जात असेल तर तो रोहित शर्माला… त्याने केलेल्या ट्विटमुळे युझर्स आता त्याचीही फिरकी घेत आहेत.

“विराट अनुष्का तुम्हा दोघांना लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा. विराट मी तुला हजबंड हँडबुक देईल आणि अनुष्का तुझं आडनाव बदलू नकोस बरं”, असं ट्विट रोहितनं केलंय.

दरम्यान, नेटकऱ्यांनी मात्र रोहित शर्माची खेचण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे कुठून अवदसा आठवली, असं काहीसं रोहित शर्माला झालं असावं.