Top News खेळ

विराट बनला सर्वात वेगवान आणि सर्वात जलद; सचिनचाही विक्रम मोडला!

कॅनबेरा | टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याने अजून एका विक्रमाला गवसणी घातलीये. विराट वनडेमध्ये 12 हजार रन्स करणारा सर्वात वेगवान खेळाडू बनला आहे.

कॅनबेरा येथे आज तिसरी वनडे मॅच रंगली आहे. या मॅचमध्ये विराटने हा विक्रम आपल्या नावे केला आहे. गेल्या दोन मॅचमध्ये कोहलीने 110 रन्स केले होते. त्यामुळे आज मैदानावर उरताना त्याला केवळ 23 धावांची गरज होती.

हा विक्रम मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याच्या नावे होता. सचिनने 309 सामन्यांत 12 हजार रन्स केले होते. मात्र कोहलीने 251 मॅचमध्ये 12 हजार रन्सचा टप्पा पार केलाय.

कोहली आणि सचिन यांच्या व्यतिरिक्त रिकी पाँटिंग, कुमार संगकारा, सनथ जयसूर्या तसंच महेला जयवर्धने या खेळाडूंनी वनडे क्रिकेटमध्ये 12 हजार किंवा त्याहून अधिक रन्स केलेत.

महत्वाच्या बातम्या-

तुटवडा की छपाई बंद???; आता एटीएममध्ये मिळणार नाहीत ‘या’ नोटा!

मुंबईला मिळालेला बॉलिवूडचा दर्जा संपणार नाही- नवाब मलिक

तिसऱ्या वनडेत भारताचं ऑस्ट्रेलियाला 303 रन्सचं आव्हान; पंड्या-जडेजाची अर्धशतकी खेळी

“माझ्याकडे 13 एकर आहे… तुला काम नसेल तर माझ्या शेतात मजुरीला ये”

“उद्धव ठाकरेंना आव्हान देणं हे योगी आदित्यनाथ यांना जमणार नाही”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या