तेव्हा विराटला जमलं नाही; आता पुन्हा एकदा करून दाखवण्याची संधी

मुंबई | चालू वर्षात आंतरराष्ट्रीय सामन्यात सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होण्याचा मान भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीचा गेल्यावर्षी हुकला होता. मात्र यावर्षी ही संधी पुन्हा एकदा विराटकडे चालून आली आहे. 

2017मध्ये विराटने 46 सामऩ्यात 68.73 सरासरीने 2818 धावा केल्या होत्या. त्यावेळी हा विक्रम फक्त 68 धावांनी हूकला होता. श्रीलंकेचा खेळाडू कुमार संघकाराने 2014मध्ये 48 सामन्यात 2868 धावा केल्या होत्या. त्यामुळे हा विक्रम त्याच्या नावावर आहे. 

यावर्षी मात्र भारतीय संघ एकूण 47 सामने खेळला आहे. त्यातले विराटने 31 सामने खेळला आहे. यावर्षी विराटने या 31 सामन्यात 2411 धावा केल्या आहेत. विक्रमासाठी त्याला 456 धावांची गरज आहे. 

दरम्यान, वर्षाअखेरापर्यंत 3 टी-20 आणि 3 कसोटी सामने खेळण्याची संधी विराटकडे आहे. त्यामुळे विराट हा विक्रम आपल्या नावावर करू शकतो.

महत्त्वाच्या बातम्या-

-तृप्ती देसाई यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी!

-1 जानेवारीपासून पुण्यात हेल्मेटसक्ती!

-फक्त ‘भारतमाता की जय’ बोलणे म्हणजे राष्ट्रप्रेम नाही!

-दीपिका आणि रणवीरच्या लग्नाला शुभेच्छा देण्यासाठी मला वेळ नाही!

-तुम्ही भांडत बसा, समृद्धी महामार्गाचं नावही आम्हीच ठेऊ!