विराट कोहलीनं केला विक्रम ; दिग्गज खेळाडूंच्या यादीत समावेश

अॅडलेड |  भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली यानं ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी सामन्यात नवा विक्रम केला आहे. तो भारतातर्फे ऑस्ट्रेलियात एक हजार धावा पटकवणारा चौथा खेळाडू ठरला आहे.

भारतातर्फे सचिन तेंडूलकरनं 20 सामन्यात 1809 धावा, व्हीव्हीएस लक्ष्मणनं 15 सामन्यात 1236 तर राहूल द्रविड यानं 15 सामन्यात 1143 धावा केल्या होत्या.

विराट कोहलीनं फक्त 9 सामन्यात एक हजार धावांचा टप्पा पूर्ण केला आहे. ऑस्ट्रेलियात एक हजार धावा करणारा विराट कोहली 28 वा खेळाडू ठरला आहे.

दरम्यान, विराट कोहलीला हा विक्रम पूर्ण करण्यासाठी त्याला या डावात फक्त 5 धावा करणं आवश्यक होतं. बीसीसीआयनं विराट कोहलीच्या विक्रमाबद्दल ट्विट केलं आहे. 

महत्वाच्या बातम्या-

-ही तीन राज्ये वाढवणार का नरेंद्र मोदींचं टेन्शन ?

-…म्हणून गिरीश महाजनांवर अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याखाली गुन्हा दाखल करा!

मराठा जात प्रमाणपत्र व पडताळणीचे आदेश लागू

-सत्तेसाठी भाजपनं जंग जंग पछाडलं; योगींच्या 74 तर मोदी-शहांच्या 90 प्रचारसभा

-राहुल गांधींची ‘ती’ मुलाखत पेड न्यूज; भाजपची निवडणूक आयोगाकडे तक्रार…

धक्कादायक! राजस्थानमध्ये रस्त्यावर सापडलं मतदान यंत्र