Top News खेळ

ऑस्ट्रेलियामध्ये सिराज आणि बुमराहच्या अपमानावर किंग कोहली भडकला; म्हणाला… 

मुंबई | भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये चालू असलेल्या तिसऱ्या कसोटीमध्ये एक संतापजनक असा प्रकार घडला आहे. सामन्याच्या दुसऱ्या दिवसापासून आस्ट्रेलियाच्या काही बेअक्कल क्रिकेटप्रेमींनीकडून गोलंदाज मोहम्मद सिराज आणि गोलंदाज जसप्रीत बुमराह यांच्यावर वर्णद्वेषाची टीकेचा सामना करावा लागला आहे.

या प्रकारावर क्रिकेट वर्तुळातून टीका करण्यात येत आहे. अशातच भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने यावर आपल्या स्वभावाप्रमाणे अतिशय तिखट अशी प्रतिक्रिया दिली आहे.

वर्णद्वेषी टिपण्णी ही कदापी सहन केली जाणार नाही. सीमारेषेवर अनेकदा अशा घटनांना सामोरं जावं लागलं असून हे खूपच लाजीरवाणी बाब आहे. असभ्य वर्तनाचा हा कळस आहे. खेळाच्या मैदानावरही असं काही पहायला मिळल्यास वाईट वाटतं, असं कोहलीने म्हटलं आहे.

दरम्यान, कसोटीच्या दोन दिवसांपासून हा प्रकार घडत होता. आजच्या म्हणजे चौथ्या दिवशीही सिराजसोबत हा प्रकार घडला. त्यानंतर भारतीय संघाने पंचांकडे तक्रार दाखल केली आणि सामना थांबवत संबंधित प्रेक्षकांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला.

थोडक्यात बातम्या-

तुम्ही मुस्लिम राष्ट्र आणि चीनी खुशमस्क यांना विकले गेले आहात- कंगणा राणावत

“शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांवर होत असलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे काँग्रेसची प्रतिमा मलिन होत आहे”

‘माझ्या जीवाचं काही बरं-वाईट झाल्यास राज्य सरकार जबाबदार’; भाजप खासदाराचा सरकारला इशारा

“ज्यांच्याकडे महाराष्ट्र सैनिकांची एवढी सुरक्षा आहे त्यांची झेड सुरक्षा काढून काय तीर मारणार”

आमचं संरक्षण केवळ पोलीस करतो असं नाही- रावसाहेब दानवे

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या