टीम इंडियाचा कर्णधार कोहलीचा आणखी एक ‘विराट’ टप्पा

नवी दिल्ली | टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीनं आणखी एक विराट टप्पा पार केलाय. कोहलीनं कसोटी क्रिकेटमध्ये 5 हजार धावा पूर्ण केल्यात.

दिल्लीत सुरू असलेल्या तिसऱ्या कसोटीच्य़ा पहिल्याच दिवशी 25 धावा करून त्याचा 5 हजार क्लबमध्ये समावेश झाला. हा टप्पा पार करणारा विराट भारताचा 11 फलंदाज आहे.

भारतीय खेळाडूंमध्ये 5 हजार धावांचा टप्पा गाठणाऱ्यांपैकी विराट तिसऱ्या क्रमांकावर आहे. सुनील गावसकर आणि विरेंद्र सेहवाग हे अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर आहेत.