मुंबई | न्यूझीलंडविरुद्धच्या दोन्ही कसोटी सामन्यात भारताला पराभव स्वीकारावा लागला. या सामन्यात भारतीय कर्णधार विराट कोहलीने अनेक पर्याय अवलंबले मात्र संघाच्या पदरी पराभवच आला. सामन्यात सहजासहजा हार मानेल ते कोहली कसला?, त्याने दुसऱ्या कसोटी एक युक्ती लढविली होती, मात्र चाणाक्ष पंचांनी ती ओळखली आणि कोहलीला तंबी दिली.
दुसऱ्या सामन्यात न्युझीलंड संघ फलंदाजी करत असताना टॉम लॅथम व टॉम ब्लंडल चांगली फलंदाजी करत होते. त्यांनी दोघात शतकी सलामी केली होती. दोघे एकेरी-दुहेरी धावा घेत डाव चालवत होते. त्यामुळे भारतीय संघावर दडपण आणण्याचा प्रयत्न करत होते. अशातच लॅथमने चेंडू पुश करून एकेरी धाव घेण्यासाठी ब्लंडलला कॉल दिला.
लॅथम कॉल करत धाव पुर्ण करत असताना त्यावेळी कोहलीने (रन फॉर टू) अशी हाक दिली. खरंतर फलंदाजी करत असलेले एकमेकांना कॉल करतात. इथं मात्र कोहलीने कॉल केला. जेणेकरून दोघांपैकी एकजण बाद व्हावा आणि संघाचा पहिला गडी बद ह्वावा. पण त्यावेळी पंच रिचर्ड कॅटलबरो यांना कोहलीचा डाव लक्षात आला व त्यांनी लगेचच त्याला समज दिली.
दरम्यान, भारतीय क्षेत्ररक्षकांनी चुकून दोन धावा देऊ नये आणि चपळ क्षेत्ररक्षण करावं यासाठी मी हाक दिल्याची सारवासारव कोहलीने केली. मात्र पंचांनी कोहलीचे मत फेटाळलं आणि असं वर्तन पुन्हा करू नको अशी समजही कोहलीला दिली.
ट्रेंडिंग बातम्या-
“गळ्याची आण खरं सांगतो; …तर मुनगंटीवारांना सगळ्यात जास्त आनंद होईल”
भाजपच्या नगराध्यक्षाला 5 कोटींच्या घोटाळा प्रकरणात अटक
महत्वाच्या बातम्या-
कोरोना व्हायरस जगाला ‘या’ चार गोष्टी शिकवणार- आनंद महिंद्रा
पत्नीच्या हत्येप्रकरणी पती गेला तुरुंगात; 7 वर्षांनंतर पत्नी सापडली प्रियकरासोत
सामनात आलेल्या ‘त्या’ दोन बातम्या अन् भाजपकडून मुख्यमंत्र्यांची कोंडी
Comments are closed.