virat kohli ashish nehra twitter 650x400 81509610687 - विराट आणि नेहरा दोघांनी सांगितली 'त्या' फोटोमागची कहाणी!
- खेळ

विराट आणि नेहरा दोघांनी सांगितली ‘त्या’ फोटोमागची कहाणी!

नवी दिल्ली | नुकताच निवृत्ती घेतलेला भारतीय गोलंदाज आशिष नेहराचा लहानग्या विराट कोहलीला बक्षीस देतानाचा फोटो काही दिवसांपासून व्हायरल होतोय. आशिष नेहराच्या निरोप समारंभात दोघांनाही याबद्दल विचारणा करण्यात आली. 

“तो फोटो 2003 मधील आहे. आशिष नेहरा 2003चा वर्ल्डकप खेळून आला होता. तेव्हा मी 13 वर्षांचा होतो. शाळेच्या संघात स्थान मिळवण्यासाठी धडपडत होतो,” असं सांगताना विराट भावूक झाला.

“मी सोशल मीडियावर नाही मात्र विराट आणि माझा जो फोटो लोकप्रिय झालाय तो विराटमुळे. अन्यथा तो फक्त भिंतीवर टांगलेला फोटो राहिला असता. कोहली आता ज्या स्थानावर आहे त्यामुळे त्या फोटोचं महत्त्व वाढलंय,” असं आशिष नेहरा म्हणाला. 

या बातमीवर तुमची कमेंट लिहा