काय सांगता? विराट-अनुष्काच्या लग्नाची बातमी अफवा!

मुंबई | विराट-अनुष्काच्या लग्नाची बातमी समोर आल्यानं क्रिकेट आणि सिनेसृष्टीत एकच खळबळ उडाली होती. मात्र ही अफवा असल्याचं समोर येतंय. 

अनुष्का शर्माने हे वृत्त फेटाळून लावलं आहे. अनुष्काच्या मॅनेजरने पीटीआय वृत्तसंस्थेला यासंदर्भात माहिती दिलीय. 

9 ते 11 डिसेंबरला दोघे इटलीला विवाहबद्ध होत असल्याची माहिती माध्यमांनी दिली होती. अर्थात सुत्रांच्या हवाल्याने हे वृत्त देण्यात आलं होतं, मात्र ते सध्यातरी खोटं ठरल्याचं दिसतंय.