विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांचं अखेर शुभमंगल!

मुंबई | विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांचं शुभमंगल अखेर पार पडलं आहे. दोघांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन यासंदर्भात घोषणा केलीय. 

गेल्या काही दिवसांपासून दोघांच्या लग्नाच्या बातम्या कानावर येत होत्या, मात्र अनुष्काच्या मॅनेजरने या बातम्या फेटाळून लावल्या होत्या. मात्र एकामागून एक ज्या घडामोडी सुरु होत्या त्या पाहता दोघांचं लग्न होणार हे नक्की होतं. 

दरम्यान, वांद्र्याच्या कौटुंबिक न्यायालयात जाऊन अनुष्काने लग्न नोंदणीसाठीचा अर्ज आणल्याची माहिती होती. इटलीच्या टस्कनीमधील एका रॉयल हॉटेलमध्ये आता लग्नाचा सोहळा पार पडल्याचं कळतंय.