जे वाटतं ते तोंडावर सांगावं लागतं, तरच कामगिरी सुधारते!

लंडन | कुणी दुखावेल म्हणून बोलणं टाळायचं नसतं. जे वाटतं ते तोंडावर सांगायचं तरच सहकाऱ्यांची कामगिरी सुधारते, अशा शब्दात भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीनं आपल्या स्पष्टवक्तेपणाची कबुली दिली.

श्रीलंकेविरुद्धच्या पराभवातून धडा घेत भारतीय संघानं द.आफ्रिकेविरुद्ध जबरदस्त कामगिरी केली. याविषयी बोलताना तुमची रोखठोक मतं सहकाऱ्यांना पटवून दिलीत तरच तुमच्या संघाची घसरलेली गाडी रुळावर येऊ शकते, असं विराटनं म्हटलं.