मुंबई | विश्चषकातील भारतीय संघाच्या पराभवानंतर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले. तसेच कोहलीचं कर्णधारपद जाणार असल्याचंही बोललं जात होतं.
भारतीय संघाचं कर्णधारपद विराट कोहलीकडेच राहणार असल्याचं समजतंय. वनडे आणि 20-20 संघाची जबाबदारी देखील विराटच्या खांद्यावर ठेवण्याचा निर्णय निश्चित झाला असल्याचं कळतंय. रविवारी होणाऱ्या निवड समितीच्या बैठकीत याबाबत अधिकृत माहिती दिली जाणार आहे.
विराट कोहलीकडून कर्णधारपद काढून ती जबाबदारी हिटमॅन रोहित शर्माकडे सोपावण्यात येणार असल्याच्या चर्चांणा उधाण आलं होतं. मात्र या चर्चांणा आता पुर्णविराम मिळाला आहे.
दरम्यान, भारतीय संघ आता वेस्ट इंडिज दौऱ्यवर जाणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
Comments are closed.