बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘…तर कर्णधारपदावर राहण्याचा मला काहीच हक्क नाही’; अखेर विराटने सोडलं मौन

मुुंबई | आगामी आंतरराष्ट्रीय टी-20 विश्वचषकानंतर विराट कोहलीने टी-20 संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. विराट कोहलीच्या राजीनाम्यानंतर कर्णधारपदाची जबाबदारी रोहित शर्माकडे सोपवण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आयपीएल 2021 नंतर विराट कोहली रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाचा देखील कर्णधारपद सोडणार असल्याचं सांगण्यात येत आहे. याबाबत अनेक चर्चा रंगल्या होत्या. त्यावर आता विराट कोहलीने खुलासा केला आहे.

कर्णधारपद सोडण्याचा कारण म्हणजे कामाचा ताण. मी जबाबदारीतून पळ काढणारा व्यक्ती नाही आहे. मी मैदानावर 120 टक्के योगदान देण्याचा प्रयत्न करतो. हे योगदान मी देऊ शकलो नाही तर त्या पदावर राहण्याचा माझा काहीच हक्क नाही आहे. कर्णधारपद सोडल्यावर मी फलंदाजीवर चांगल्याप्रकारे लक्ष देऊ शकतो आणि त्याचा फायदा संघाला निश्चितच होईल, असं विराट कोहलीने एका मुलाखतीत म्हटलं आहे.

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताला एकही विश्वचषक जिंकता आला नाही. विराट कोहली 2014 पासून संघाचा कर्णधार आहे. आयपीएलमधील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा देखील विराट कर्णधार आहे, परंतु त्याला एकही आयपीएल ट्रॉफी संघाला मिळवून देता आली नाही.

दरम्यान, आयपीएल 2021 च्या बाद फेरीत विराट कोहलीचा संघ पोहचला आहे, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा सामना कोलकाता नाईट रायडर्स संघासोबत आहे. त्यामुळे अंतिम फेरीत दाखल होण्यासाठी बंगळुरूला कोलकातावर विजय मिळवावा लागणार आहे.

थोडक्यात बातम्या –

यंदाचा अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार ‘या’ तीन अर्थशास्त्रज्ञांना जाहीर!

सोनं-चांदी खरेदी करण्याआधी इथे तपासा लेटेस्ट भाव एका क्लिकवर

लखीमपूर प्रकरणात आशिष मिश्राला न्यायालयाने दिली ‘इतक्या’ दिवसांची पोलीस कोठडी

“देवेंद्र फडणवीसांना बोलण्याचा अधिकार नाही; रामराज्याच्या नावाखाली तालिबानी राजवट सुरू आहे”

“आजचा ‘महाराष्ट्र बंद’ यशस्वी, हा आघाडी सरकारचा बंद नाही तर…”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More