नवी दिल्ली | भारतीय संघ विश्वचषकातील पहिला सामना 5 जूनला खेळणार आहे. त्यापूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. सरावादरम्यान कर्णधार विराट कोहली जखमी झाला आहे.
शनिवारी सराव करताना विराट कोहलीच्या अंगठ्याला दुखापत झाली आहे. यामुळे विश्वचषकापूर्वी भारतीय संघाला हा मोठा धक्का मानला जात आहे.
संघ व्यवस्थापनेकडून विराट कोहलीच्या दुखापतीबद्दल अद्याप कोणताही खुलासा करण्यात आला नाही. विराटची दुखापत किती गंभीर आहे हे अद्याप समजू शकलं नाही.
विश्वचषकातील पहिल्या सामन्यापूर्वी कर्णधाराला दुखापत झाल्यामुळे भारतीय संघात चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे.
महत्वाच्या बातम्या
-“जोपर्यंत शिवसेनेचा महापौर असणार तोपर्यंत त्याला राणीच्या बागेतच बसवला पाहिजे”
-भाजप ममतांना पाठवणार ‘जय श्रीराम’ लिहिलेले 10 लाख पोस्टकार्ड
-मनसेची पुण्यात बैठक; पदाधिकाऱ्यांना मोबाईल गेटवरच जमा करण्याचे आदेश!
-25 वर्षीय तरुणाने 50 हून अधिक महिलांचे केले लैंगिक शोषण; पोलिसांनी केली अटक
-सत्ताधाऱ्यांनी धार्मिक उन्माद वाढवला; शरद पवारांची भाजपवर टीका
Comments are closed.