‘सचिन’लाही जमलं नाही, ते ‘विराट’नं केलं!

मुंबई | बांगलादेशविरुद्धचा सामना एकहाती जिंकून भारतानं चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात भारतानं झोकात प्रवेश केला. या सामन्यात भारताला अभिमान वाटावा, असा पराक्रम घडला. सर्वात वेगानं ८ हजार धावा बनवण्याचा विक्रम भारताचा कर्णधार विराट कोहलीने स्वतःच्या नावे केला. १७५ सामन्यांमध्ये त्याने हा पराक्रम केला आहे.

विराटच्या आधी हा विक्रम द.आफ्रिकेच्या ए.बी.डिव्हिलियर्सच्या नावे होता. त्याने १८२ सामन्यांमध्ये हा पराक्रम केलाय. तर हा विक्रम करण्यासाठी सौरव गांगुलीला २०० तर सचिन तेंडुलकरला २१० सामने खेळावे लागले होते.