बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

महिला क्रिकेटपटूच्या मदतीला विराट कोहली धावला; केली ‘इतक्या’ लाखांची मदत

मुंबई | भारतीय संघाचा स्टार खेळाडू विराट कोहली आणि बाॅलिबूड अभिनेत्री अनुष्का शर्मा यांनी कोरोनाच्या कठीण काळात कोरोनाग्रस्तांसाठी एक विशेष मोहिम सुरु केली आहे. त्या मोहिमेअंतर्गत विराट आणि अनुष्का फंड जमा करुन तो फंड कोरोना संकटात रूग्णासाठी देत आहेत. विराट अनुष्काच्या या मोहिमेला लोकंही भरपूर प्रतिसाद देताना दिसत आहेत.

भारताची माजी महिला क्रिकेटर के एस श्रावंती नायडूला हिच्या आईवर सध्या रूग्णालयात उचपार सुरू आहेत. तिच्या आईच्या उपचारासाठी आतापर्यंत तिने 16 लाख रूपये खर्च केला आहे. त्यानंतर देखील उपचारासाठी आणखी पैसे लागत होते. बीसीसीआय साऊथ झोनचे माजी संयोजक एन विद्या यादव यांनी ट्विट करुन श्रावंतीला मदतीचं आवाहन केलं होतं. हे ट्विट विराटने पाहिल्यानंतर विराटने लगोलग मदत पाठवण्याचा निर्णय घेतला.

विराट कोहलीने त्यानंतर लगेच श्रावणीला 6 लाख 77 हजारांची मदत पोहोचवली. विराटच्या या मदतीनंतर भारतीय संघाचे प्रशिक्षक आर श्रीधर यांनीही श्रावणीच्या आईला आर्थिक मदत पोहोचवली. लगोलग झालेली मदत पाहून आश्चर्य वाटलं. भारतीय संघातल्या मोठ्या क्रिकेटपटूनी असं पाऊल उचलणं हे स्वागतार्ह आहे, असं  एन विद्या यादव म्हणाल्या.

दरम्यान, अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीने भारतातल्या कोविड मदत कार्यासाठी सात कोटी रुपयांचा निधी उभारण्याची घोषणा केली होती. यातील दोन कोटी रुपयांचा निधी अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांनी स्वतः दिला आहे. केट्टो डॉट ओआरजी (ketto.org) या क्राउडफंडिंग प्लॅटफॉर्मवरून #InThisTogether या नावाने हा निधीउभारण्याचा उपक्रम राबवला जात आहे.

थोडक्यात बातम्या-

गेले 27 वर्ष प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करत असलेल्या ‘या’ मालिकेच्या नव्या पर्वाचं ट्रेलर प्रदर्शित

आमच्या मागे ईडी आली तर खिशात चणे, फुटाणे आणि शेंगदाणे मिळतील- गिरीश बापट

‘…तेव्हा मराठा आमदार आणि खासदारांनी माझं-तुझं केलं तर बघा’; खासदार संभाजीराजेंचा इशारा

“मोदी दिलदार आहेत, गुजरातला 1000 कोटी दिले, महाराष्ट्राला 1500 कोटी देतील”

‘…हे तर आत्मघातकी सरकार’; कोकण दौऱ्यात फडणवीसांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More