Top News खेळ

विराट कोहलीने कर्णधारपद सोडून जबाबदारी रोहित शर्माकडे सोपवावी; माजी खेळाडूची मागणी

नवी दिल्ली | कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने आयपीएलचं जेतेपद पटकावलंय. तर आयपीएलमध्ये विराट कोहलीला तसंच त्याच्या संघाला साजेशी कामगिरी न करता आल्याने त्याच्यावर टीका होतेय.

यातच आता टीम इंडियाच्या मर्यादित षटकांच्या संघाच्या कर्णधारपदाची धुरा रोहित शर्माकडे सोपवावी अशी मागणी मागणी खेळाडू गौतम गंभीर याने केली आहे.

गौतम गंभीर म्हणाला, “आता विराट कोहलीनेच कर्णधारपदावरून पायउतार होताना ट्वेंटी-20 संघाच्या नेतृत्वाची धुरा रोहित शर्माकडे सोपवली पाहिजे.”

दरम्यान इंग्लंडचा माजी कर्णधार नासीर हुसैन यांनी देखील रोहितच्या खेळीचं कौतुक केलं आहे. शिवाय ट्वेंटी-20 वर्ल्डकपसाठी विराट कोहलीने कर्णधारपदावरून पायउतार होऊन रोहितकडे जबाबदार सोपवण्याची हीच योग्य वेळ असल्याचं ते म्हणालेत.

महत्वाच्या बातम्या-

शेवटची ओवाळणी! शहीद ऋषिकेश जोंधळेंना बहिणीने ओवाळलं

काँग्रेस नेतृत्त्वाला बिहारमधील पराभव सामान्य बाब वाटत असावी- कपिल सिब्बल

राज्याच्या मंत्रालयाचा नवीन पत्ता म्हणजे कृष्णकुंज- संदीप देशपांडे

हाथरसच्या नावाने गरळ ओकणारे राज्य सरकारचा आता कुणी गळा धरलाय?- निलेश राणे

“बिहार निवडणुकीदरम्यान राहूल गांधी शिमल्यात लुटत होते पिकनीकची मजा”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या