Top News खेळ देश

कशी नशिबानं थट्टा आज मांडली!; ‘शून्य…’ विराट कोहलीचा विश्वासच बसला नाही!

Photo Courtesy- Twitter/Cricketcomau

चेन्नई | पालक झाल्यानंतर क्रिकेटच्या मैदानावर परतलेल्या कर्णधार विराट कोहलीचा वाईट फॉर्म अजूनही कायम आहे. इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात विराटला भोपळाही फोडता आला नाही. मोईन अलीनं त्याला आल्या पावली माघारी धाडलं, फक्त ५ चेंडू खेळण्याचं भाग्य त्याला लाभलं.

धक्कादायक बाब म्हणजे शून्य… फक्त शून्यावर आपण बाद झालोय, यावर विराटचा विश्वासच बसत नव्हता. विकेटकीपरचा हात स्टंपला लागल्याचा संशय त्याला आला होता. अखेर मैदानावरील पंचांनी तिसऱ्या पंचांची मदत घेऊन विराट बाद झालाय, या गोष्टीवर शिक्कामोर्तब केलं, त्यानंतर कुठे तो चालता झाला.

विराट कोहलीचा आपल्या फॉर्मसोबत संघर्ष सुरु आहे. २०२० मध्येही त्याला काही खास खेळता आलेलं नाही. त्यामुळे यावेळी मुलीच्या जन्मानंतर तरी विराटला फॉर्म गवसेल, असं बोललं जात होतं, मात्र सारं फोल ठरताना दिसत आहे. उर्वरित भारतीय संघावरही विराट बाद झाल्याचं दडपण आलं आहे.

दरम्यान, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप खेळायची असेल तर भारतीय संघाला या कसोटी सामन्यासोबतच ही मालिकाही जिंकावी लागणार आहे, अन्यथा विराटचं सुद्धा ही टेस्ट खेळण्याचं स्वप्न पूर्ण होऊ शकणार नाही. दुसरीकडे न्यूझीलंड ऑलरेडी या स्पर्धेच्या फायनलमध्ये जागा मिळवण्यात यशस्वी ठरला आहे. भारत, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात दुसऱ्या स्थानासाठी स्पर्धा आहे.

पाहा व्हिडीओ-

 

थोडक्यात बातम्या-

जगातील सर्वात जबरदस्त इलेक्ट्रीक कार लाँच; जाणून घ्या काय आहे किंमत

नगरसेवकाच्या हत्येचं धक्कादायक CCTV फुटेज; हलक्या काळजाच्या लोकांनी पाहू नये!

“राज्यपाल स्वतःच्याच कासोट्यात पाय गुंतून सारखे का पडत आहेत”

आता येतेय सर्वात स्वस्त स्कॉर्पिओ; किंमत असणार फक्त….

‘या’ कारणामुळे पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात अद्याप कारवाई नाही!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या