बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“विराट कोहलीला कायमचा डच्चू, रोहित नव्हे ‘या’ खेळाडूला करणार पूर्णवेळ कर्णधार”

नवी दिल्ली | भारतीय क्रिकेट सध्या मोठ्या बदलातून जात आहे. टी-ट्वेंटी क्रिकेट कर्णधारपदाचा विराट कोहलीनं राजीनामा दिल्यानंतर आता कोहलीच्या इतर संघाच्या कर्णधारपदाबाबत सुद्धा अनेक तर्क लावण्यात येत आहेत. भारताच्या सर्वकालिन महान कर्णधारांमध्य़े विराट कोहलीचा समावेश होतो. अशातच विराटच्या कर्णधारपदाबाबत दिग्गज क्रिकेटपटू दानेश कनेरियानं एक मोठं वक्तव्य केलं आहे.

सध्या भारत-न्यूझीलंडदरम्यान कसोटी मालिका खेळवण्यात येत आहे. या मालिकेत कोहलीनं पहिल्या सामन्यापूर्वी विश्रांती घेतली आहे. अशातच आता तो परतल्यानंतर कर्णधारपद कुणाकडं जाणार याची सध्या जोरदार चर्चा चालू आहे. अशात दानेश कनेरीयानं विराट कोहली आता भारतीय संघाचं कर्णधारपद हाकणार नसल्याचं वक्तव्य केलं आहे.

विराट कोहलीला कायमचा डच्चू मिळणार असल्याची शक्यता कनेरियानं व्यक्त केल्यानं क्रिकेट विश्वातील सर्वांच्याच भूवया उंचावल्या आहेत. कसोटी प्रकारात विराटच्या नेतृत्वातच भारतानं विश्व अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता. विराट कसोटी प्रकारातील  भारताचा सर्वोत्तम कर्णधार मानला जातो.

दरम्यान, दानेश कनेरियानं अशा प्रकारचं वक्तव्य केलं असलं तरी बीसीसीआयकडून विराट कोहली न्यूझीलंडविरूद्धच्या दुसऱ्या कसोटीत भारतीय संघाची कमान सांभाळणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.

थोडक्यात बातम्या 

राज्याच्या राजकारणात खळबळ उडवणारी कारवाई, मंचरमध्ये इन्कम टॅक्सची छापेमारी

11 अभिनेत्री सेक्स रॅकेटमध्ये रंगेहाथ पकडल्या गेल्या, सिनेसृष्टीत खळबळ उडवणारा प्रकार

दिल्लीवरुन सूत्रं हलणार, प्रणिती शिंदेंना मिळणार ही’ मोठी जबाबदारी?

“सदाभाऊ पाय पडले तर पडळकर नांगरे पाटलांना भिऊन…”, सदावर्तेंचे नवे गौप्यस्फोट

“…म्हणून मी एक मराठा लाख मराठा घोषणा दिली”, सदावर्तेंचं स्पष्टीकरण

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More