बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘आजकालचे क्रिकेटपटू कोणताही मोठा निर्णय….’; विराटच्या कर्णधारपद सोडण्यावरून कपिल देव संतापले!

मुंबई | भारताचा कर्णधार विराट कोहली टी-20 चं कर्णधार पद सोडणार आहे. भारतीय टी-20 क्रिकेट संघाच्या कर्णधारपदावरून पायउतार असल्याच खुद्द कोहलीने 16 सप्टेंबर रोजी सांगितलं आहे. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना याचा फार मोठा धक्का बसला आहे. याच पार्श्वभूमीवर भारताला विश्वचषक जिंकवून देणारे कर्णधार कपिल देव यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

मी असा कधीच विचारही करू शकत नाही जसे आजकालचे क्रिकेटर्स वागतात. ते कोणताही मोठा निर्णय स्वत:च घेऊन मोकळे होतात. त्यांना व्यवस्थापन आणि निवडकर्ते अशा कोणाबरोबर चर्चा करणे गरजेचं वाटत नाही. कोहलीने एका अपयशी दौऱ्यानंतर निर्णय घेणं चुकीचं आहे. तो एक महान खेळाडू आहे, असं कपिल देव यांनी म्हटलं आहे.

भारताचा माजी महान खेळाडू रवी शास्त्री, सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा, बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शहा यांच्याशी चर्चा करून मी निर्णय घेतला आहे. त्यावर जर विराटने खरच अशाप्रकारे बातचीत करून निर्णय घेतला आहे तर वेल डन विराट. त्याचा हा वैयक्तिक निर्णय असला तरी त्याने देशाची जी सेवा केली त्यासाठी त्याचं धन्यवाद आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा, असंही कपिल देव यांनी सांगितलं.

दरम्यान, सध्या सोशल मीडियावर विराट कोहलीच्या या निर्णयावर खुपच चर्चा रंगली आहे. त्यात काहींनी विराटला पुढील भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. विराट कोहलीला एकही आयपीएल ट्रॉफी जिंकवून देता न आल्यानं तो कर्णधार सोडणार असल्याच्या कमेंट् देखील सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी केल्या आहेत.

थोडक्यात बातम्या-

भाजपमधून बाहेर पडत सन्यास घेतो म्हणणाऱ्या बाबुल सुप्रियोंचा तृणमूलमध्ये प्रवेश!

शिवसेेनेसोबतच्या युतीबाबत राधाकृष्ण विखे-पाटील यांचं मोठं वक्तव्य, म्हणतात…

“2.5 कोटींहून अधिक लसीकरण झालं, मात्र अचानक एका राजकीय पक्षाला रिअॅक्शन झाली”

सलग दुसऱ्या दिवशीही अनिल देशमुखांच्या मालमत्तेवर आयकर विभागाची छापेमारी

करुणा शर्मांच्या अडचणींत वाढ, आणखी दोन दिवस रहावं लागणार कोठडीत

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More