बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

विराट कोहलीने ठोकलं दमदार अर्धशतक! पाकला दिलं ‘इतक्या’ धावांचं आव्हान

मुंबई | टी-20 आंतरराष्ट्रीय विश्वचशक स्पर्धेत पाकिस्तानने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीला उतरलेल्या भारताची सलामीवीर जोडी स्वस्तात माघारी परतल्यानंतर भारताचा कर्णधार विराट कोहलीने डाव सांभाळला. त्याने 57 धावांची महत्त्वपूर्ण खेळी साकारत भारताला 151 धावापर्यंत पोहोचवलं.

पाकिस्तानच्या शाहिन आफ्रिदीने घातक गोलंदाजी करत पहिल्या षटकामधील 4 थ्या चेंडूमध्ये रोहितला बाद करत भारताला पहिला धक्का दिला. त्यानंतर पुढच्याच षटकामध्ये के.एल, राहुलला देखील आफ्रिदीने बाद केलं. पाककडून शाहिन आफ्रिदीने 4 षटकामध्ये 3 बळी टिपत फक्त 31 धावा दिल्या.

भारताची सलामीवीर जोडी बाद झाल्यानंतर विराट कोहलीने डाव सांभाळला. त्याने 57 धावांची खेळी साकारली आणि विश्वचषकामध्ये सर्वात जास्त 10 अर्धशतक झळकवण्याचा विक्रम नावावर केला. त्या अगोदर सुर्यकुमारने 1 चौकार आणि 1 षटकाराच्या साहाय्याने 11 धावा केल्या. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या रिषभ पंत 39 धावावर झेलबाद झाला. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या हार्दिक पांड्याला मोठी धावसंख्या उभारता आली नाही आणि भारताने पाकिस्तान संघासमोर 152 धावांचं लक्ष्य ठेवलं आहे.

पाकिस्तान विरुद्ध भारताची मिस्ट्रीवरून चक्रवर्तीला भारतीय संघात स्थान मिळेल की नाही, अशी चर्चा होती. वरून चक्रवर्ती आणि शार्दुल ठाकूर यांच्यात कोणाला संधी मिळेल, असा सवाल उपस्थित केला जात होता. मात्र अखेर शार्दूलला राखीव ठेवत वरूनला संधी मिळाली. त्यामुळे आता भारतीय प्रमुख गोलंदाजापैकी कोणता गोलंदाज प्रभावी कामगिरी करणार ते आता पाहावं लागणार आहे.

थोडक्यात बातम्या- 

मुंबईच्या कोरोना आकडेवारीत कमी अधिक प्रमाणात घट, जाणून घ्या आजची आकडेवारी

मराठी साहित्य संमेलनावरून नियोजक आणि अध्यक्षांमध्ये पत्रापत्री वाद रंगला

भारताला जबरदस्त धक्का! भारताची सलामीवीर जोडी स्वस्तात माघारी परतली

‘गांजाच्या नशेत जर कुणी सरकार पाडण्याचा प्रयत्न करत असेल तर…’; संजय राऊतांची तुफान टोलेबाजी

“राज्य सरकार हॉटेल, लॉन्सला परवानगी देते म्हणजे तिथे काहीही धंदे करा असं सांगत नाही”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More