विराट कोहलीची नजर ‘या’ विक्रमावर! भारत-पाकिस्तान सामन्यात करू शकतो कमाल
नवी दिल्ली | क्रिकेट जगतातील महान खेळाडू म्हणून भारतीय कर्णधार विराट कोहलीची गणना होते. विराट कोहलीनं आपल्या अप्रतिम फलंदाजीच्या जोरावर अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. सध्या जगातील सर्वाधिक शतकं करणाऱ्या खेळाडूंमध्ये विराटचा समावेश होतो. असं असलं तरी विराट कोहलीला एक विक्रम करता आला नाही. सध्या याच विक्रमाची चर्चा सर्वत्र रंगली आहे.
विराट कोहली कसोटी आणि वनडे क्रिकेटमध्ये शतक करण्यात यशस्वी ठरला आहे. पण अद्यापही विराटला टी-ट्वेंटी प्रकारात शतक करता आलं नाही. क्रिकेटच्या तीनही प्रकारात शतक झळकावण्याची कामगिरी आतापर्यंत केवळ तीन भारतीय फलंदाजांनी केली आहे. रोहित शर्मा, सुरेश रैना आणि के.एल राहूल या तिघांनीच भारताकडून तीनही प्रकारात शतकं झळकावली आहेत.
विराट कोहली 24 तारखेला होणाऱ्या सामन्यात शतक झळकावून हा विक्रम आपल्या नावावर करू शकतो. विराटनं आतापर्यंत अनेक बहारदार खेळ्या साकारल्या आहेत. वैयक्तिक 94 धावा ही त्याची टी ट्वेंटीमधील सर्वोत्तम धावसंख्या आहे. आपल्या ताकदवान खेळीनं क्रिकेट जगतात अनेक नविन विक्रम कोहलीनं आपल्या नावावर केले आहेत.
दरम्यान, विराट कोहलीला एकही शतक झळकावता आलं नसलं तरी टी-ट्वेंटी प्रकारात सर्वाधिक धावा विराटच्याच नावावर आहेत. गेल्या 2 वर्षांपासून विराटला क्रिकेटच्या तीनही प्रकारात एकही शतक झळकावता आलं नाही. परिणामी विराट कोहली आपल्या अप्रतिम खेळीचं प्रदर्शन या विश्वचषकात करेल, अशी अपेक्षा क्रिकेट रसिकांना आहे.
थोडक्यात बातम्या
महाराष्ट्रातील ‘या’ तालुक्याने रचला इतिहास, केलं 100 टक्के लसीकरण पुर्ण
“प्रेयसीनं दगा दिला म्हणजे प्रियकराला…”; मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपुर्ण निकाल
साखर कारखान्याच्या निवडणुकीत एका मतासाठी 3 हजार मोजले, पार्ट्या केल्या अन्…; शिवसेना आमदाराची कबुली
“फडणवीसांनी याचे पुरावे सादर करायला हवे”
प्रभू रामचंद्राच्या दर्शनासाठी राज ठाकरे अयोध्येला जाणार, कांचन गिरीजींनी घेतली भेट
Comments are closed.