बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

विराट कोहलीचा गगनचुंबी षटकार! शार्दूलचा चेंडू थेट स्टेडियमबाहेरील रस्त्यावर; पाहा व्हिडीओ

मुंबई | रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि चेन्नई सुपर किंग्ज या दोन्ही संघात आज आयपीएलचा सामना सुरू आहे. नाणेफेक जिंकून चेन्नईने बंगळूरूला प्रथम फलंदाजी करण्यासाठी आमंत्रण दिलं. त्यानंतर विराट कोहली आणि देवदत्त पडिक्कल या जोडीने बंगळुरू संघाला दमदार सुरू करून दिली आणि चेन्नईला 156 धावाचं लक्ष्य दिलं. यात देवदत्त पडीक्कलने 50 चेंडूत 70 धावा कुटल्या. तर विराटने अर्धशतकी खेळी केली. यामध्ये विराट कोहलीने शार्दूल ठाकूरला उत्तुंग षटकार लगावला आणि चेंडू थेट स्टेडियमबाहेर गेला. हा षटकार पाहून क्रिकेट चाहते अवाक झालेत.

चेन्नईचा गोलंदाज शार्दूल ठाकुर चौथा षटक टाकण्यासाठी आला. तेव्हा विराटने शार्दूलच्या चौथ्या चेंडूवर गगनचुंबी षटकार ठोकला आणि चेंडू स्टेडिअम बाहेर गेला. या सामन्यात विराट कोहलीने 54 धावांची उपयुक्त खेळी केली. या खेळीत 4 खणखणीत चौकारांचा समावेश आहे.  तर कोहली आणि पडीक्कल या जोडीने केलेल्या उपयुक्त खेळीने बंगळुरू संघाने 6 गडीच्या मोबदल्यात 156 धावांपर्यंत मजल मारली.

आयपीएलच्या गुणतालिकेत सध्या चेन्नई सुपर किंग्ज 12 गुणांसह दुसऱ्या तर बंगळुरू तिसऱ्या क्रमांकावर आहे. आय़पीएलमध्ये बंगळुरू संघाला चेन्नईविरोधात 27 सामन्यात फक्त 9 वेळा विजय मिळवता आलं आहे. त्यामुळे आजचा सामना कोणता संघ जिंकणार याकडे चाहत्याचं लक्ष लागून आहे.

दरम्यान, नुकत्याच आलेल्या वृत्तानुसार सध्या चेन्नईचे सलामीवीर फाफ डुप्लेसिस 20 धावांवर तर ऋतुराज गायकवाड 27 धावांवर खेळत आहे. तर चेन्नईची धावसंख्या 4 षटकानंतर 49 झाली आहे.

पाहा व्हिडीओ-

 

थोडक्यात बातम्या-

‘भारत बंद’ला राष्ट्रवादी काँग्रेसचा संपूर्ण पाठिंबा – जयंत पाटील

किरीट सोमय्यांबाबत त्यादिवशी जे घडलं ते चुकीचंच होतं – अजित पवार

मोठी बातमी! ‘या’ तारखेपासून राज्यातील मंदिरं उघडणार; मुख्यमंत्र्यांकडून सुधारित आदेश जारी

जळगावात भाजपला मोठा धक्का! तब्बल ‘इतके’ नगरसेवक करणार शिवसेनेत प्रवेश

‘किरीट सोमय्यांमध्ये हिंमत असेल तर..’; राजू शेट्टीचं किरीट सोमय्यांना आव्हान

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More