Virat Kohli Shoes l विराट कोहली (Virat Kohli), जागतिक क्रिकेटमधील एक सुपरस्टार, काय वापरतो, काय खातो, याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात. लहान मुले आणि तरुण खेळाडू तर विराट कोहलीच्या (Virat Kohli) शूज बद्दल विशेष माहिती घेऊ इच्छितात. विराट कोहली (Virat Kohli) कोणत्या ब्रँडचे (Brand) शूज वापरतो आणि त्याची किंमत काय, हे जाणून घेऊया.
विराट कोहलीची (Virat Kohli) एकूण संपत्ती :
विराट कोहली (Virat Kohli) सध्या जगातील सर्वोत्तम, श्रीमंत आणि लोकप्रिय खेळाडूंपैकी एक आहे. त्याची एकूण संपत्ती 1000 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. त्यामुळे साहजिकच, तो वापरत असलेल्या वस्तू उच्च दर्जाच्या आणि महागड्या असणार.
‘पुमा’ (Puma) ब्रँडचा वापर :
भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) क्रिकेटच्या मैदानावर ‘पुमा’ (Puma) या प्रसिद्ध ब्रँडचे शूज घालून खेळताना दिसतो. ‘पुमा’ (Puma) ही एक जागतिक स्तरावरची स्पोर्ट्सवेअर (Sportswear) कंपनी आहे.
विराट कोहली (Virat Kohli) ‘पुमा’ (Puma) या ब्रँडचा ब्रँड ॲम्बेसेडर (Brand Ambassador) आहे. त्यामुळे तो नेहमी याच कंपनीचे शूज वापरतो.
शूजची किंमत ;
डीएससी (DSC) या भारतीय स्पोर्ट्स कंपनीच्या माहितीनुसार, विराट कोहली (Virat Kohli) वापरत असलेल्या ‘पुमा’ (Puma) शूजची किंमत साधारणपणे 20 ते 30 हजार रुपयांच्या दरम्यान असते.