पंचांनी 5 धावा दिल्या नाहीत म्हणून विराट कोहलीचा त्रागा!

कोलकाता | आयसीसीच्या नव्या नियमानूसार 5 धावा न मिळाल्याने विराट कोहली पंचावरच चिडला. मात्र ड्रेसिंग रुममध्ये असल्याने त्याला त्रागा करण्यापलिकडे काही करता आलं नाही. 

53 व्या षटकात भुवनेश्वरने मारलेला फटका अडवताना दिनेश चंडीमलच्या हातून चेंडू निसटला, मात्र त्याने थ्रो करण्याचं नाटक केलं. आयसीसीच्या नव्या नियमानूसार असं केल्यास समोरच्या संघाला 5 धावा बहाल करण्यात येतात. 

पंचांनी चंडीमलच्या या कृत्याकडे दुर्लक्ष करुन त्याला फक्त समज दिली. ड्रेसिंग रुममध्ये असलेला विराट कोहली मात्र या प्रकारामुळे चांगलाच नाराज झालेला दिसला.