97 धावांवर असतानाच विराटला डाव घोषित करायचा होता, पण…

कोलकाता | भारताचा कर्णधार विराट कोहली स्वतःच्या विक्रमापेक्षा संघाचं हित जपण्याला नेहमीच प्राधान्य देतो. त्याच्या या गोष्टीचा पुन्हा एकदा प्रत्यय आला. 

कोलकाता कसोटी विराट 97 धावांवर खेळत असतानाच त्याने डाव घोषित करण्याची तयारी दर्शवली होती. ड्रेसिंग रुमकडे पाहात त्याने रवी शास्त्रींना तशी विचारणाही केली होती. मात्र शास्त्रींनी त्याला खेळ चालू ठेवण्यास सांगितलं. 

श्रीलंकेविरुद्धच्या या डावात विराटने नाबाद 104 धावांची खेळी केली. हे त्याचं आंतरराष्ट्रीय कारकीर्दीतलं विक्रमी 50 वे शतक ठरले. 97 धावांवर त्याने डाव घोषित केला असता तर हा विक्रम त्याच्या नावे नक्कीच झाला नसता.