सहकाऱ्यांच्या पगारवाढीसाठी विराट आग्रही, बीसीसीआयला सुनावलं

नागपूर | संघातील सहकाऱ्यांसाठी कर्णधार विराट कोहलीनं पगारवाढीची मागणी केलीय. त्याचबरोबर बीसीसीआयच्या नफ्यातील वाटाही वाढवून मागितलाय.

टीम इंडियातील टॉप खेळाडूंची कमाई दुप्पट नफ्यासह साधारण 20 कोटींच्या घरात आहे. बीसीसीआयसोबत भारतीय संघाची बैठक होणार आहे. बोर्डासमोर खेळाडूंच्यावतीनं कर्णधार विराट कोहली, माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि प्रशिक्षक रवी शास्त्री मागण्या मांडणार आहेत.

भारतीय संघातील खेळाडूंना कामगिरीच्या आधारे 3 श्रेणींत विभागण्यात येतं. त्यानुसार खेळाडूंसोबत वार्षिक करार करण्यात येतो.