बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

रोहित-विराटला मोठा झटका! सर्वोत्तम प्लेइंग इलेवनमध्ये स्थान नाही

नवी दिल्ली | भारतीय क्रिकेट संघ सध्या क्रिकेट सोडून वादामुळ जास्त चर्चेत आहे. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीला बीसीसीआयनं वनडे संघाच्या कर्णधारपदावरून डच्चू दिला आहे. रोहित शर्माच्या गळ्यात कर्णधारपदाची माळ पडली आहे. पण अंतरराष्ट्रीय स्तरावर या दोन्ही खेळाडूंना आपल्या खराब फलंदाजीचा फटका बसला आहे.

जागतिक टी-ट्वेंटी संघामध्ये स्थान मिळवण्यात विराट कोहली आणि रोहित शर्मा या दोघांनाही अपयश आलं आहे. इतकंच नाही तर भारतीय संघातील फक्त एक खेळाडू अंतिम 11 खेळाडूंमध्ये स्थान मिळवू शकला आहे. या संघाचं नेतृत्व पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम करणार आहे. तर सलामीला त्याचा संघसहकारी मोहम्मद रिजवान याची संघात निवड झाली आहे.

विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यासोबतच इतरही भारतीय खेळाडू या संघात स्थान मिळवण्यात अपयशी ठरले आहेत. रविंद्र जडेजा या संघात सामिल असलेला एकमेव भारतीय खेळाडू आहे. परिणामी भारतीय संघाच्या खराब कामगिरीची कल्पना या संघातील खेळाडूंच्या समावेशावरून करता येईल.

दरम्यान, भारतीय संघाला यावर्षीच्या विश्वचषकात पाकिस्तानकडून मानहानिकारक पराभवाला समोरं जावं लागलं होतं. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम या जागतिक संघाचं नेतृत्व करणार आहे. परिणामी हा विराट कोहलीच्या साम्राज्याला धक्का मानला जात आहे.

थोडक्यात बातम्या 

आनंदाची बातमी! सीरमच्या ‘कोवोवॅक्स’ लसीला WHO ची मान्यता

सरकारचा मोठा निर्णय! MPSCच्या ‘त्या’ उमेदवारांना मिळणार आणखी एक विशेष संधी

“चंद्रकांत पाटील म्हणजे पुरोगामी महाराष्ट्राला लागलेला व्हायरस”

“12 खात्याच्या मंत्र्यांना थेट आव्हान देऊन तुम्ही…”, धनंजय मुंडेंनी केलं रोहित पवारांचं कौतुक

सुकेश चंद्रशेखरचं नवं कनेक्शन! बाॅलिवूडमधील 12 अभिनेत्रींची नावं समोर आल्यानं खळबळ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More