बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

न्यूझीलंडला नमवण्यासाठी विराटसेना सज्ज! दोन्ही संघासाठी ‘करो या मरो’ची लढाई

मुंबई | जगातील सर्वात रोमांचक क्रिकेट स्पर्धा म्हणजेच टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धा युएईत खेळवली जात आहे. भारतीय संघ या स्पर्धेच्या विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानला जात आहे. भारताला पहिल्या सामन्यात लाजीरवाणा पराभव स्विकारावा लागला होता. मात्र, आता आपल्या सर्व चुका सुधारून पुन्हा भारतीय संघ न्यूझीलंडला नमवण्यासाठी सज्ज झालेला दिसत आहे.

आज भारत आणि न्यूझीलंड यांच्यात संध्याकाळी सामना खेळवला जाणार आहे. पहिल्या सामन्यात भारताचा पराभव झाला होता तर, न्यूझीलंडचा देखील पहिल्या सामन्यात पाकिस्तानने पराभव केला होता. त्यामुळे आजचा सामना दोन्ही संघासाठी करो या मरो सामना असणार आहे. त्यामुळे ब गटातील अंतिम दोन कोणते असतील हे आज निश्चित होईल. आजच्या सामन्यात भारतीय संघात दोन मोठे बदल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

पाकिस्तानविरूद्ध हार्दिक पांड्याला दुखापत झाली होती. त्यानंतर त्याला रूग्णालयात नेण्यात आलं होतं. आता तो पुर्णपणे फिट असल्याचं विराट कोहलीने म्हटलं आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात ईशान किशन किंवा हार्दिक पांड्याला जागा मिळू शकते. तर दुसरीकडे भुवनेश्वर कुमारच्या ऐवजी शार्दुल ठाकूरला संधी मिळण्याची शक्यता आहे. याबाबत अंतिम निर्णय मैदानाची पडताळणी केल्यानंतर घेण्याची शक्यता आहे.

दरम्यान, मिस्ट्री स्पिनर वरूण चक्रवर्ती याला पाकिस्तान विरूद्ध काही खास कामगिरी करता आली नाही. त्यामुळे आजच्या सामन्यात अनुभवी रवीचंद्रन आश्विनला संधी मिळण्याची शक्यता आहे.

थोडक्यात बातम्या-

“मोदी सरकारचे मंत्री विनोदाच्या फुलबाजा पेटवतात मग माचीस, तेल, नोकऱ्या, पगार याचं काय?”

“मी छोटा पैलवान आहे, तुम्ही मला इतका सोपा समजू नका”

सकाळी ‘हे’ 4 पदार्थ खा; वजनही कमी होईल आणि होतील फायदेच फायदे

पुण्यात मोठी दुर्घटना! निर्माणाधीन इमारतीचा स्लॅब कोसळल्याने 12 जण जखमी

“सेना-भाजपला स्पष्ट बहुमत होतं, तरीही शरद पवारांनी सरकार बनवलं, हा तर…”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More