खेळ

विराट कोहलीमुळे जर्मनीचा पराभव; इटलीच्या पराभवालाही तोच कारणीभूत!

नवी दिल्ली | नेटकरी कोणत्या गोष्टीवरून कोणाला कसं ट्रोल करतील याचा नेम नाही. आता फिफा विश्वचषकाच्या सामन्यात जर्मनीचा पराभव झाल्याने नेटकऱ्यांनी भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीला ट्रोल केलं आहे. 

विराटनं फिफासाठी जर्मनीला प्रोत्साहन दिल्यानं ते हारले असं म्हणत नेटकऱ्यांनी विराटला ट्रोल करण्यास सुरूवात केली आहे. शिवाय विराटने इटलीमध्ये लग्न केलं म्हणून इटलीचा संघ पात्रता फेरीतून बाद झाला. आपीएलमधील दिल्ली, बंगळुरू, पंजाब या संघांमधून जेव्हा विराट खेळला तेव्हा त्यांना जिंकता आले नाही, असंही नेटकऱ्यांनी म्हटलं आहे. 

दरम्यान, विराटच्या काही चाहत्यांनी यावर खंत व्यक्त करत विराट त्याच्या स्टाईलमध्ये लोकांना उत्तरं देईल, असं म्हटलं आहे. 

महत्त्वाच्या बातम्या –

-कोणतीही निवडणूक लढवणार नाही; रामदास कदम यांची मोठी घोषणा

-आमच्याशिवाय सरकार स्थापन करणे अशक्य- प्रकाश आंंबेडकर

-औरंगजेबानं जबरदस्तीनं काश्मिरी पंडितांचं धर्मांतर केलं होतं!

-मनसे नवी स्ट्रॅटेजी करुन पुन्हा एकदा कमबॅक करणार???

-अमित ठाकरेंना राजकारणात आणा; मनसे नेत्यांची मागणी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या