बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोहलीने धोनीसाठी केलेल्या ‘या’ ट्विटची सोशल मीडियावर रंगलीये चर्चा

नवी दिल्ली | चेन्नई सुपरकिंग्ज विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स या प्ले-ऑफसाठी खेळण्यात आलेल्या सामन्यात चेन्नईने विजय मिळवला. दोन्ही संघाासाठी हा सामना जिंकणे गरजेचं होतं. त्यामुळे प्रेक्षकांना दोन्ही संघाच्या खेळाडूंच्या रोमांचक खेळीचा अनुभव घेता आला. मात्र कालचा सामना रोमांचक बनवणारी अजुन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे महेंद्रसिंग धोनीने चेन्नईला विजय मिळवण्यासाठी केलेली शानदार खेळी. त्यामुळे कालपासून चर्चेचा विषय राहिलेल्या धोनीसाठी आता विराटनेही एक विशेष ट्विट केलं आहे.

विराटने केलेलं ट्विट सध्या चर्चेत आलं आहे. विराटने या ट्विटमध्ये लिहीले की, “आणि शेवटी राजा परत आलाच, खेळाच्या इतिहासातील महान फिनीशर. मला पुन्हा एकदा खेळ पाहताना जागेवर उडी मारता आली.” या शब्दात विराटने  धोनीचं कौतुक केलं आहे. कालपासूनच धोनीने खेळलेल्या शानदार खेळीचं कौतुक होतं आहे. बीसीसीआयनेही ट्विट करत धोनीचं कौतुक केलंय. त्यातच विराटने धोनीसाठी केलेलं ट्विटदेखील सोशल मीडियावर चर्चेत आहे.

काल धोनीने खेळलेल्या अफलातून खेळीमुळे त्याच्या चाहत्यांसह सर्व खेळाडूंनीही त्याला डोक्यावर घेतलं. काल झालेल्या सामन्यात दिल्लीच्या गोलंदाजांनी अफलातून गोलंदाजी केल्याने चेन्नई हारणार अशी परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र नेहमीप्रमाणेच धोनीने बॅट हातात घेतली आणि सामना पलटवून टाकला. शेवटी 2 बॉल राखत चेन्नईने दिल्लीवर विजय मिळवला आणि धोनीने पुन्हा एकदा सर्वोत्तम खेळाडू असल्याचं दाखवून दिलं.

प्रेक्षकांनी शेवटचा सामना हा विराट आणि धोनी यांच्यात खेळण्यात यावा, अशी इच्छा व्यक्त केली आहे. मात्र त्यासाठी विराटला आज म्हणजे 11ऑक्टोबरला बंगळूर विरूद्ध कोलकाता या सामन्यात विजय मिळवावा लागणार आहे. त्यानंतर बंगळूरूला दिल्लीला मात द्यावी लागेल. त्यानंतर धोनी आणि विराट मैदानावर एकमेकांसमोर खेळताना दिसू शकतील. प्रेक्षक या रोमांचक सामन्याची वाट पाहत आहेत.

Anddddd the king is back the greatest finisher ever in the game. Made me jump Outta my seat once again [email protected]

— Virat Kohli (@imVkohli) October 10, 2021

थोडक्यात बातम्या-

तो आला, त्यानं पाहिलं… अन् चौकार-षटकार मारुन पुन्हा जिंकून दिलं!

आजच्या महाराष्ट्र बंदला ‘या’ संघटनांचा असणार सक्रिय पाठिंबा

आज महाराष्ट्र बंदची हाक! कोणत्या सेवांवर होणार परिणाम?, वाचा सविस्तर

‘गृहराज्यमंत्र्यांचा राजीनामा घ्या’; नवाब मलिकांनी घेतला आक्रमक पवित्रा

“केवळ आश्वासनाचे डोंगर उभा करून ठेवलेत, मदत म्हणून फुटकी कवडी सुद्धा दिली नाही”

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More