…म्हणून बांगलादेशच्या चाहत्यानं विराटची वेबसाईट हॅक केली

मुंबई | आशिया चषकात बांगलादेशला त्यांचा पराभव सहन झालेला दिसत नाहीये. बांग्लादेशच्या एका चाहत्यांने चक्क भारताचा कर्णधार विराट कोहलीची वेबसाईट हॅक करत आयसीसीला लक्ष्य केलं आहे.

बांग्लादेशचा खेळाडू लिटन दासला धोनीने यष्टिचीत करत माघारी पाठवले. तिसऱ्या पंचांनी त्याला बाद ठरवले. याचा राग आल्याने विराटची वेबसाईट हॅक करण्यात आली आहे.

‘क्रिकेट हा जंटलमन गेम राहिला आहे का? प्रत्येक संघाला समान न्याय दिला जात आहे का? लिटनला बाद कसे ठरवले याचे उत्तर द्या? त्या चुकीच्या निर्णयाची माफी मागत नाही आणि त्या पंचावर कारवाई करत नाही, तोपर्यंत आणखी वेबसाईट हॅक होत राहतील, असा मेसेज या साईटवर लिहिण्यात आला आहे.

 

महत्त्वाच्या बातम्या-

-शेतकऱ्यांसमोर सरकार नमलं; पोलिसांची माघार

-उगा कोणालाही ‘आमदार’ म्हणू नका- अजित पवार

-मनसे ही अल्-कायदा आणि आयसीस सारखी संघटना- तनुश्री दत्ता…

-सचिन तेंडुलकरचं टेंशन वाढलं; मुलगा अर्जुनचं करिअर धोक्यात!

-पवारांनी अगोदर पक्षाकडं लक्ष द्यावं, मग जिल्ह्याकडे; पंंकजा मुंडेंचा पवारांना सल्ला!

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या