बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

विराटची लाडकी कार विक्रीसाठी बाजारात, किंमत ऐकून तुम्हालाही बसेल धक्का!

मुंबई | भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीचे जगभरात लाखो चाहते आहेत. त्याच्या उत्तम खेळीबरोबरच विराटच्या रॉयल लाईफस्टाईलचे देखील अनेक लोक दिवाणे आहेत. महागड्या गाड्या वापरण्याच्या विराटच्या छंदाची तर नेहमीच सोशल मीडियावर चर्चा चालत असते. त्याच्याकडे एकाहून एक अधिक महागड्या गाड्या आहेत. त्यातच आता विराटची लाडकी कार आता विक्रीसाठी बाजारात उतरणार आहे.

विराटच्या कार कलेक्शनमध्ये बीएमडब्ल्यू, ऑडी आशा नावाजलेल्या ब्रँडच्या अनेक गाड्या आहेत. विराटच्या कार कलेक्शनमधील एक कार आता विक्रीसाठी बाजारात आली आहे. या कारचं नाव आहे ‘लंबोर्गिनी गलार्डो स्पायडर’.

विराटच्या लंबोर्गिनीची किंमत सध्या 1.35 कोटी रुपये एवढी आहे. 2015 साली गॅलार्डो मॉडेल कारचं शेवटचं मॉडेल मार्केटमध्ये आलं होतं. 2015 साली विराटने ही कार खरेदी करून काही महिने वापरल्यानंतर पुन्हा विकली होती. त्यानंतर आता विराटने वापरलेली लंबोर्गिनी गलार्डो स्पायडर आता पुन्हा विक्रीसाठी तयार असल्याचं रॉयल ड्राइव्ह कंपनीच्या मार्केटिंग मॅनेजरने सांगितलं आहे.

दरम्यान, ही कार केवळ 10 हजार किलोमीटर चालल्याचं देखील कोचीच्या मार्केटिंग मॅनेजरने सांगितलं आहे. तिचा सर्वोच्च वेग ताशी 324 किलोमीटर आहे. या कारमध्ये 5.2 लिटरचं V10 इंजिन आहे. आता विराटची ही कार कितीला विकली जाणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या –

“माझी लढाई एक प्रकारची क्रांती, आता शांत बसणार नाही”

धावबाद होताच फलंदाजाने रागाने फेकली बॅट अन्…; पाहा व्हिडीओ

“कन्यादान करायला मुलगी वस्तू आहे का?”; कन्यादान शब्दावर आलियाचा आक्षेप

दिलासादायक! राज्यातील कोरोना रूग्णसंख्येत दिवसेंदिवस होतेय लक्षणीय घट

पंजाबच्या नवीन मुख्यमंत्र्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्या शुभेच्छा; म्हणाले…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More