बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

T-20 World Cup: भारताच्या पराभवानंतर विराटची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला…

नवी दिल्ली| टी-20 वर्ल्ड कपचा भारत विरुद्ध पाकिस्तान रंगतदार सामना पहायला मिळाला. या सामन्यात भारतावर पाकिस्ताननं विजय मिळवला. यामुळे भारताला मोठा धक्काच बसला आहे. पाकिस्ताननं भारतावर 10 विकेट्सनं विजय मिळवला असून आतापर्यंतच्या टी-20 वर्ल्ड कपच्या सामन्यात पाकिस्तानचा हा पहिलाच विजय आहे. भारताच्या दारूण पराभवानंतर आता विराट कोहलीनं पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

टी-20 सामन्यात पराभवर झाल्यानंतर विराटनं यावर प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही आखलेल्या रणनीतीप्रमाणं काही झालं नसल्यामुळे हा पराभव झाल्याचं विराटनं म्हटलं. एका पराभवानं खचून जाणारी आमची टीम नाही. ही स्पर्धेची सुरुवात असूून अजून याचा शेवट बाकी आहे.

भारतीय संघानं पहिल्यांदा फलंदाजी करताना काही चुका केल्या आणि त्याचा फटका त्यांना बसला. पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहिन आफ्रिदीने रोहित शर्मा आणि लोकेश राहुल यांना झटपट बाद केले आणि तोच भारताला मोठा धक्का बसला होता.

दरम्यान, या विजयाचे श्रेय पाकिस्तानला द्यायला हवे, कारण त्यांनी आमच्यापेक्षा सरस खेळ केला. आम्हाला मैदानात ज्या गोष्टींची अंमलबजावणी करायची होती, ती आम्हाला जमली नाही, असंही विराटनं म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या – 

“ठाकरे सरकारला जरा जरी लाज असेल तर…”

तुम्ही पिताय तो चहा भेसळयुक्त चहा पावडरपासुन तर बनवलेला नाही ना?, असं ओळखा

T-20 World cup: पाकिस्तानी पत्रकाराच्या ‘त्या’ प्रश्नावर भडकला कोहली, म्हणाला…

‘या’ पाच गोष्टी ठरल्या भारताच्या पराभवासाठी कारणीभूत

धक्कादायक! ‘फ्रेंड्स’ वेबसिरीजमधील ‘या’ प्रसिद्ध कलाकाराचं दु:खद निधन

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More